Kirti Kulhari Short Hair Video: सध्या ओटीटीवर असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांंमध्ये भलतेच लोकप्रिय आहेत. अभिनेत्री किर्ती कुल्हारी 'ह्यूमन' आणि 'फॉअर मोस्ट शॉर्ट्स प्लीज' (Four More Shots Please) या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबमालिकेतील तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून किर्ती कुल्हारी ही ओटीटीपासून लांब आहे परंतु ती अनेक लहानमोठ्या इव्हेंटमधून स्पॉट होताना दिसली. किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari Instagram Video) सोशल मीडियावर सक्रिय आहेत. तिचे इन्टाग्रामवर लाखो फॅन्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी आलेल्या 'ह्यूमन' (Human) या वेबसिरिजमधून ती बरीच चर्चेत आली होती. यामध्ये तिचा आणि शेफाली शहाचा किसिंग सिन होता. यातील तिची लेसबियन डॉक्टरची भुमिका प्रचंड गाजली होती आणि तिचे बरेच कौतुकही झाले होते. परंतु सध्या तिच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिनं आपला लेटेस्ट हेअरकट (Kirti Kulhari Short Hair) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिनं आपले केस ट्रिम केले आहेत आणि बॉयकट केला आहे. (actress kirti kulhari trimmed her hair shares her new look on instagram post fans trolls)


आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून दिली माहिती


यावरून मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ तिनं आज रविवारी पोस्ट केला आहे. आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या या लुकविषयीची माहिती दिली आहे. आपण असे अचानक शॉर्ट हेअर (Kirti Kulhari New Look) का केले याबाबत तिनं ही माहिती दिली आहे. 


हेही वाचा - फ्रंट कट गाऊन घातल्यानं Malaika Arora ट्रोल; नेटकरी म्हणाले, ''उर्फीची आंटी आली''


आपण आपल्या या नव्या लुकबाबत खूप आनंदी असल्याचे तिनं म्हटलं आहे. त्याचसोबत तिनं हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''एक महिन्यांपुर्वी मी हा निर्णय घेतला होता जो मी आज साकर केला आहे.'' अनेकांनी तिचा हा लुक पाहून तिचं कौतुक केले आहे तर अनेकांनी तिला ट्रोलही (Kirti Kulhari Trolled) केलं आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''आता तरी हा लुक चांगला दिसतो आहे आता पुढे हा लुक फार वाईट दिसेल''. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''काय पण हा जोक आहे.'' तर अजून एका युझरनं लिहिलंय की, ''नको ते धाडस करायला कोणी सांगितलं?''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पोस्टमधून केली इंडस्ट्रीची पोलखोल?


किर्ती कुल्हारीनं आपल्या पोस्टमध्ये (Kirti Kulhari Post) लिहिलंय की, ''मी हा लुक महिन्याभराआधीच करणार होते परंतु आज मी तो करून आले आहे. मी ज्या या इंडस्ट्रीमध्ये काम करते येथे हिरोईन असणं सोप्पं नाही त्याचसोबत अनेक बंधनं ही येतातच. आज मी गेली 15 पंधरा वर्षे या इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यानंतर आज मी माझ्या मनाप्रमाणे वागते आहे.


मी इतकी वर्षे माझ्या मनाप्रमाणे काहीच करू शकले नव्हते आणि जर मी काही करायला गेलेच तर ते मानदंडाप्रमाणे नव्हते. पण आज मी माझ्या मनाप्रमाणे वागायला सुरूवात केली आहे आणि यामुळे मला फार आनंद होतो आहे आणि माझ्या मनासारखं आयुष्य जगते आहे. (ता.क. - हा लुक मी माझ्यासाठी केला आहे. हा कुठल्या रोलसाठी नाही)''