मुंबई : चित्रपटसृष्टीतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कास्टींग काऊचचा शिकार ठरल्या आहेत. मग ती इंडस्ट्री कुठलीही असो बॉलिवू़ड, टॉलिवू़ड अथवा हॉलिवूड, या सर्वंच चित्रपटसृष्टीत अशा घटना घडत असतात. मात्र या अभिनेत्रीने कास्टींग काऊचवर बोलताना अभिनेत्रींनाच दोषी ठरवलं आहे. त्यामुळे या अभिनेत्रीवर आता सर्वंच स्तरावरून टीका होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेच्या घानामधली अभिनेत्री किसा जिबेकल हीने कास्टिंग काउचसाठी मुलीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यूटीव्ही घाना ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मुली स्वतःला निर्मात्यांसमोर झोकून देतात. ती पुढे म्हणते, कास्टींग काऊचमध्ये निर्मात्याला दोष नसतो. मुली स्वतः पुरुषांना सेक्स ऑफर करतात. या संबधित एक घटनाही तिने यावेळी सांगितली.  


ती घटना काय?
जिबेकलने एका फिल्म कंपनीत काम करत असताना घडलेली एक घटना सांगितली. ती म्हणाली, मी एका फिल्म कंपनीत पीए आणि सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. त्या काळी मुली माझ्याकडे यायच्या आणि विचारायच्या की, कोणासोबत झोपताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल.


त्यामुळे ती पुढे म्हणते, माझ्या माहितीप्रमाणे निर्माते मुलींकडून सेक्सची मागणी करत नाहीत. तर मुली माझ्याकडे येऊन विचारायच्या की, मला कोणाशी सेक्स करून चित्रपटात भूमिका मिळू शकते, त्यामुळे मी निर्मात्यांना दोष देणार नाही. मुली स्वतःला निर्मात्यांच्या स्वाधीन करतात, असे ती म्हणते.  


तु कॉम्प्रोमाईस केली आहेस का या प्रश्नाच्या उत्तरात जिबेकल म्हणाली की, मला असा अनुभव कधीच आला नाही आणि चित्रपटातील भूमिकेसाठी स्वत:ला कधीही निर्मात्याच्या हाती सोपवावे लागले नसल्याचे तिने स्पष्ट केले.  


दरम्यान जिबेकल या विधानानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर यूजर्स अभिनेत्री किसा जिबेकलवर जोरदार टीका करत आहेत.