मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला चेक बाउंसप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ६ महिन्यांच्या तुरुंगवासासह ४ लाख ६४ हजार इतकी रक्कमही देण्याचे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडेल पूनम सेठीने कोयना मित्राविरोधात २०१३ मध्ये चेक बाउंसबाबत तक्रार दाखल केली होता. पूनम सेठीने, कोयनाने माझ्याकडून २२ लाख रुपये घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर काही पैसे परत करताना तिने मला ३ लाख रुपयांचा चेक दिला होता. मात्र तो बाउंस झाल्याचं पूनमने सांगितलं. चेक बाउंस झाल्यानंतर पूनमने कोयनाविरोधात तक्रार दाखल केली.


मात्र कोयना मित्राने तिच्यावर लावण्यात आलेले हे सर्व आरोप फेटाळले आहेत. न्यायालयात सुनावणीवेळी माझे वकील उपस्थित नव्हते, त्यामुळे न्यायालयाने माझी बाजू न ऐकताच मला शिक्षा सुनावल्याचे तिनं म्हटलंय.


या प्रकरणात मला अडकवलं जात असून या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं तिने म्हटलंय.