Lakshmi Manchu Angry Video: सोशल मीडियावर अनेकदा अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. खासकरून सेलिब्रेटींचे व्हिडीओ हे जास्त व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा व्हिडीओंची ही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून सेलिब्रेटी हे अनेकदा ट्रोलही होताना दिसतात. अशावेळी त्यांचे हे असे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतात. कॅमेऱ्यामध्ये नेहमीच असे काही क्षण व्हायरल होतात आणि फार जास्त प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्या मुलाखत सुरू असताना एका अभिनेत्रीचा पारा वाढला आणि कॅमेऱ्याच्यामध्ये येणाऱ्या एकाला त्यानं पाठीत धपाटा घातला आणि दुसऱ्यांदा जेव्हा एक कोणीतरी कॅमेऱ्याच्यामध्ये आला तेव्हा मात्र त्यालाही ती जोरात ओरडली. यावेळी मुलाखत घेणारी मात्र जोरात हसू लागली त्यामुळे हा व्हिडीओ पाहून एकच हशा उडाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की हा व्हिडीओ एवढा व्हायरल का होतो आहे आणि नक्की यात असं यावेळी काय घडलं आहे? बॉलिवूडमध्ये अनेकदा मोठंमोठे अवोर्ड फंक्शन्स होत असतात. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. अशावेळी सेलिब्रेटींची डान्स परफॉर्मन्स आणि अनेक गाणी ही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. SIIMA 2023 हा दक्षिणेतील खूप मोठा अर्वोर्ड फंक्शन आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. यंदा या अवोर्ड फंक्शनची सोशल मीडियावर चर्चा आहे. या सोहळा यंदा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री लक्ष्मी मंचूची सर्वत्र चर्चा होती. लक्ष्मी मंचू ही फार मोठी आणि आघाडीची अभिनेत्री आहे. ती एक आघाडीची अभिनेत्री आणि निर्मातीही आहे. 


हेही वाचा : भावाच्या फ्लॉप डेब्यूवर बोलला सनीचा धाकटा मुलगा राजवीर, म्हणाला, 'मी नशीबवान...'


या सोहळ्यातला तिचा एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यात ती रेड कार्पेटवर मुलाखत देते आहे आणि तिचीच सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. यावेळी ती या आऊटफिटमध्ये फारच सुंदर आणि आकर्षक दिसते आहे त्यामुळे तिचीच सर्वत्र चर्चा आहे. मुलाखतकार तिला प्रश्न विचारत असते आणि त्यातून ती फार आनंदात मुलाखतही देत असते. परंतु तिची मुलाखत ही सुरू असताना मध्येच एक माणूस कॅमेऱ्यासमोरून जातो आणि तिचा राग अनावर होतो. मग ती त्याला बाजूला हो म्हणून सांगण्यासाठी ती तिला चक्क पाठीतच मारते. त्यानंतर ती पुन्हा शांत होते परंतु यावेळी कॅमेऱ्यासमोर पुन्हा एकदा एक माणूस येतो आणि त्यालाही ती फार ओरडते. 



लक्ष्मी मंचू ही अभिनेते मोहन बाबू आणि विद्या देवी यांची मुलगी आहे. 2011 आलेल्या 'अनगनगा ओ धीरडू' या चित्रपटातून तिनं तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. आतापर्यंत तिनं बॉलिवूड आणि साऊथ इंडियन इंडस्ट्रीत काम केले आहे.