Mahima Chaudhry : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमानं अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्यात परदेस', 'दिल है तुम्हारा', 'दाग', 'धड़कन' आणि 'दिल क्या करे' सारखे अनेक कलाकार आहेत. महिमा जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हा तिच्यासोबत खूप मोठा अपघात झाला होता. ज्यामुळे फक्त तिच्या शरिराला हानी झाली नव्हती तर बराच काळ तिचा आत्मविश्वास देखील हादरला होता. त्यातून महिमा बाहेर आली. आता अखेर महिमानं त्यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पिंकव्हिला' ला दिलेल्या मुलाखतीत महिमा चौधरीनं तिच्या त्या काळाविषयी सांगितलं आहे, जेव्हा तिचा खूप मोठा अपघात झाला होता. त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. तिनं सांगितलं की गाडीत शूटिंग करण्यासाठी बाहेर गेली होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दूधाच्या ट्रकनं तिच्या गाडीला धडक मारली होती. त्यामुळे गाडीचा संपूर्ण काच हा तिच्या चेहऱ्यावर तुटला आणि 67 काचेचे तुकडे हे तिच्या चेहऱ्यातून काढण्यात आले. याविषयी महिमानं या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे. 



महिमा यावेळी म्हणाली की मला वाटलं की मी मरते आणि त्यावेळी कोणीही मला रुग्णालयात पोहचवण्यास मदत केली नाही. रुग्णालयात पोहोचल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतर माझा आई, अजय तिथे पोहोचले आणि ते बोलू लागले. त्यावेळी मी उठली आणि आरशात माझा चेहरा पाहिला आणि त्यावेळी मी खूप घाबरले. जेव्हा त्यांनी माझी सर्जरी केली तेव्हा त्यांनी चेहऱ्यातून माझे 67 तुकडे काढले. 


हेही वाचा : ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!


याच मुलाखतीत महिमानं पुढे सांगितलं की 'तिनं तिच्या अपघाताविषयी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला होता. महिमानं सांगितलं की ती घाबरली होती की तिच्या अपघातावरून तिला कोणी पाठिंबा देणार नाहीत, आणि तिला ही पण भीती होती की जेव्हा चित्रपट ऑफर करण्याची वेळ येईल तेव्हा ते तिला जज करू शकत होते. ती म्हणाली की त्यावेळी मी यावर चर्चा केली असती आणि म्हटलं असतं की माझा असा अपघात झाला आहे, तर त्यांनी म्हटलं असतं की ओह्ह, हिचा तर चेहरा खराब झाला आहे. चला दुसऱ्या कोणाला साइन करूया...'