मलायका अरोराने केला होता मोठा खुलासा, म्हणाली होती मी 11 वर्षांची असताना आई-वडील...
अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये ती 11 वर्षांची असताना काय झालं होतं याचा खुलासा केला आहे.
Malaika Arora : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, अनिल अरोरा यांनी मुंबईतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण उद्याप समोर आले नाही. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
या घटनेने मलायकाच्या तिच्या कुटुंबासोबतच्या नातेसंबंधावर विशेषत: लहानपणापासून तिला ज्या संघर्षांचा सामना करावा लागला आहे. यावर प्रकाश टाकला आहे. तिने तिच्या पालकांच्या विभक्ततेबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. ज्याचा तिच्या सुरुवातीच्या काळात तिच्यावर अधिक परिणाम झाला होता.
मागील मुलाखतींमध्ये तिने उघड केले की तिचे वडील अनिल अरोरा आणि जॉयस केवळ 11 वर्षांची असताना वेगळे झाले. तिची बहीण अमृता अरोरा तेव्हा फक्त सहा वर्षांची होती. एका तुटलेल्या कुटुंबात वाढल्याने नि:संशयपणे तिच्यावर भावनिक ठसा उमटवला. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला आकार दिला.
मलायकाचे वडील काय करायचे?
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केलं होतं. अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. पंजाबी असलेल्या अनिल यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केलं होतं. दोघांना मलायका आणि अमृता या दोन मुली झाल्या. पण, काही काळानंतर त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर मलायकाचे आई-वडील वेगळे झाले. त्यावेळी अभिनेत्री मलायका अरोरा ही 11 वर्षांची होती. मलायकाने एक मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, तिचे बालपण हे खूप छान होते. मात्र, ते खूप सोपं नव्हतं. परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवत असतात. असं तिने म्हटलं होतं.
विभक्त झाल्यानंतर पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी जे काही करावं लागतं ते मी शिकले. तेच सर्व धडे माझ्या जीवनाचा आणि प्रवासाचा आधार आहेत. आज देखील मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यामुळे मी याची कदर करते की मी आताही माझ्या अटींवर माझे आयुष्य जगते.