मुंबई : विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांचा आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. एकीकडे ट्रेलरमध्ये भरपूर कॉमेडी आणि भजन गाणी आहेत, तर दुसरीकडे अतिशय भावूक सीन्सची झलकही पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीच्या आयुष्यात अचानक एक मोठा ट्विस्ट येतो, ज्यामुळे कथेची संपूर्ण रूपरेषा बदलते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आणि YRF च्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा, आसिफ खान, आशुतोष उज्ज्वल यांच्या भूमिका आहेत. भारती पेरवानी. ही या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


अभिनेत्री मानुषी छिल्लर ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने "द ग्रेट इंडियन फॅमिली" मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. 



द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट  भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच कळतंय. मानुषी छिल्लर एका सशक्त  स्त्रीची भूमिका साकारताना बघायला मिळणार असून जिचा प्रवास विकीच्या पात्राला आधार देणारा आधारस्तंभ म्हणून उलगडणार आहे. प्रेक्षक त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती असून प्रीतमने या चित्रपटाला  संगीत दिले आहे. 


ट्रेलर मधून मानुषी छिल्लरच्या करिष्माने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या तेजस्वी मोहकतेसह " द ग्रेट इंडियन फॅमिली " एक अनोखा चित्रपट असणार यात शंका नाही.


मानुषी छिल्लरचे बॉलीवूडमधील काम बघता येणाऱ्या चित्रपटात ती नक्कीच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून एक उत्तम चित्रपट सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.