मुंबई : फिलौरी' अभिनेत्री मेहरीन पीरजादा, जेव्हा तिने कॉंग्रेस नेते भव्या बिश्नोईसोबत साखरपुडा केला तेव्हा ती बरीच चर्चेत आली होती. आता अशी बातमी समोर आली आहे की, मेहरीनने हा साखरपुडा मोडला आहे आणि भव्या बिश्नोईपासून वेगळी झाली आहे. तिने स्वत: ही माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोडला साखरपुडा
मेहरीन पीरजादाने यावर्षी मार्चमध्ये कॉंग्रेस नेते भव्य बिश्नोई यांच्याशी साखरपुडा केला होता आणि या साखरपुड्यानंतर लवकरच हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. पण आता हा साखरपुडा मोडला आहे.



भव्य बिश्नोई कॉंग्रेसचे नेते आहेत
भव्य बिश्नोई हे कॉंग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू आहेत. भव्याचे वडील कुलदीप बिश्नोई हरियाणाच्या आदमपूरचे आमदार आहेत. एंगेजमेंट होण्यापूर्वीच दोघांचे एक फोटोशूट करण्यात आलं होते, जे मेहेरिनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं होतं.



दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचं मेहरीन एक सुप्रसिद्ध नाव
मेहरीन कौर पीरजादा दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. याचबरोबर तिने अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मेहरीन कौर पीरजादाने 'कृष्णा गाड़ी वीरा प्रेमा गाढा' या चित्रपटातून दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मेहरीनला 'Mahanubhavudu'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.


मेहरीनचा भाऊही आहे एक मॉडेल 
मेहरीन कौर पीरजादाचा जन्म पंजाबच्या भटिंडा येथील शीख कुटुंबात झाला. मेहरीन बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिचा भाऊ गुरुफाते पिरजादा एक मॉडेल आणि अभिनेता आहे.