मुंबई : कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अंकिताने सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ शेअर करताच तो झपट्याने व्हायरल होतो. अंकीताचे व्हिडीओ चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरत असतात.  अंकीता ही रील स्टार म्हणुन जितकी लोकप्रिय आहे तितकीच ती अनेकदा सामाजिक भानही जपत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अंकिताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकितासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेही दिसत आहे. खरंतर या व्हिडिओत या दोघीही जोरदार भांडताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मृण्मयी अ‍ॅंकरिंग करताना दिसतेय. यानंतर अंकिता येते आणि मृण्मयीला म्हणते अँकर का? यावर मृण्मयी अंकिताकडे बघून म्हणते ''हो सॉरी पण तू कोण?' यानंर अंकिता म्हणते 'खरंतर मलाच दिलं होतं अँकरिंग पण मी सांगितलं की, मृण्मयीला घ्या त्यानंतर मृण्मयी हसू लागते आणि म्हणते ओळखतं का तुला कोणी कारण मी तुला ओळखलं नाही सॉरी. यानंतर अंकिता म्हणते एक मिनीट माझे पण फॉलोअर्स आहेत. यानंतर मृण्मयी म्हणते माझ्याकडे ब्लूटिक आहे. जा मला काम करु देत. यावर अंकिता म्हणते कोकणात ना जाऊचोच खर्च अडिच हजार रुपये आसा त्यामुळे जाता येताना आम्ही अशे तीन-तीन ब्लू टिक विकत घेव शकतो कळला. 


यावर मृण्मयी म्हणते, हो कागं मग का नाही म्हणलीस या अँकरिंगला यावर कोकण हार्टेड गर्ल म्हणते अपकमिंग प्रोजेक्ट्स आणि त्यामध्येच मी सुपर बिझी आहे. यावर मृण्मयी म्हणते, सुपर बिझी मग ईथे यायला कसा वेळ मिळालाय तुला. का आलीयेस ईथे? यावर अंकिता म्हणते, मी बघायला आलीये की तुला अँकरिंग किती जमतंय. यावर मृण्मयी म्हणते, तुला ईकडे येऊन बघण्याची गरज नाहीये कारण दर बुधवार पासून शनिवारपर्यंत साडे नऊ वाजता तुला तुझ्या घरामध्ये बसून टीव्हीवरती बघू शकतेस मला अँकरिंग करताना तुझ्या घरात अँकरिंग करताना टीव्हीवर बघू शकतेस. जा जा जा मला माझं काम करु देत आणि एटिट्यूडवाले एक्सप्रेशन देत हसू लागते आणि अंकिताही तिथून निघून जाते. यानंतर मृण्मयी पुन्हा पुटपुटू लागते आणि म्हणते, कुठून येतात काय माहिती. यानंतर तिथून निघून गेलेली अंकिता पुन्हा येते आणि मृण्मयीच्या चेहऱ्यावर केस उडवते आणि म्हणते 'जळता मेला.' यानंतर मृण्मयीही आश्चर्यचकित होते.


खरंतर हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या भांडणाचा नसून हा एक प्रमोशनल फंडा आहे. कारण झी मराठी वाहिनीवर 'सा रे ग म प लिटल चॅम्प्स' 9 ऑगस्टपासून, बुध ते शनि, 9.30  वाजता सुरु होतंय. त्यामुळे त्याचाच हा प्रमोशल फंडा आहे. अंकिता झी मराठीसोबत अनेकदा कोलॅब्रेशन करताना दिसते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लवकरच अंकिताचा 'तूच मोरया' हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडीओ आहे. अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत असून अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे.