Nargis Fakhri on Bollywood: कंगना राणावतनं बॉलीवूडच्या स्टार कीड्सवर हल्लाबोल करत एकच गदारोळ केला होता. त्यातून कशाप्रकारे बॉलीवूडमध्ये नेपोटिझम आहे आणि कशाप्रकारे बाहेरून येणाऱ्या नव्या कलाकारांना इथे मात्र काहीच जागा मिळत नाही यावर तिनं आवाज उठवला होता (Kanagna Ranaut on Nepotism). त्यापुर्वीही तनूश्री दत्ताच्या मीटू मुव्हमेंटनं एकच हल्लाबोल एका होता. त्यानंतरही बॉलीवूड आणि कॉर्ट्रोव्हर्सी हे जणू समीकरणच होऊ गेलं. अनेकदा अनेक अभिनेत्री - अभिनेते बॉलीवूडवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं बॉलीवूडवर घणाणून टीका केली आहे. (actress nargis fakhi says shes facing physical illess who took break fro two years)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास आठ वर्षे बॉलिवूडमध्ये पदार्पण करून प्रेक्षकांच्या नजरेत भरलेली अभिनेत्री नर्गिस फाखरीनं (Nargis Fakhri) बॉलीवूडवर टीका केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, फिल्म इंडस्ट्रीमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 42 वर्षीय नर्गीस फाखरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. नर्गिसने सांगितले की तिला कायम 'हौशी' म्हटलं जायचं कारण तिचं ज्यांच्याशी पटत नसे त्यांच्याशी ती बोलायची नाही. त्यामुळे तिला मुडी, आगाऊ असे संबोधले जायचे. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


नर्गिसने एका मुलाखतीत सांगितले की, "मला या सिनेमाच्या संस्कृतीत कसे चालावे - बोलावे हे माहित नव्हते. मी माझ्या भावनांबद्दल प्रामाणिक असल्याने, मला सांगण्यात आले की तु जे वागतेस ते योग्य नाही. तुला लोकांशी बोलावे लागेल जरी तुला कितीही आवडत नसलं तरी. मला असंही सांगितले गेले की तुला असं गप्प बसून चालणार नाही तुला लोकांशी संवाद साधावा लागले. तुला असं मुडी राहून चालणार नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले या क्षेत्रात तीन प्रकारचे चेहरे आहेत. एक बिझनेस फेस, एक क्रिएटिव्ह फेस आणि नंतर एक तुमचा स्वतःचा खरा चेहरा."


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नर्गिस पुढे म्हणाली, "मी 8 वर्षे दररोज या क्षेत्रात काम केलं. मी कधीही सुट्टी घेतली नाही. मी माझ्या कुटुंबालाही क्वचितच भेटू शकले. जास्त काम केल्याने तणाव निर्माण झाला आणि जास्त तणावामुळे मला अस्वस्थ वाटू लागले. परिणामी मला आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या. मी डिप्रेशनमध्ये होते का असंही मला वाटू लागलं. तेव्हा मी माझ्या परिस्थितीवर नाखूष होते आणि स्वतःला विचारत होते की मी अजूनही तिथे काय करत आहे? मी स्वतःला बरे करण्यासाठी दोन वर्षांची सुट्टी घेतली." अशी भावना नर्गीसनं व्यक्त केली होती. 


नर्गिस फाखरी ही अमेरिकन अभिनेत्री आहे. तिन बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2011 मध्ये नर्गिसने रणबीर कपूर स्टारर 'रॉकस्टार' (Rockstar) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण श्रेणीत नामांकन मिळाले होते. 


नर्गिसनं नंतर जॉन अब्राहम स्टारर पॉलिटिकल ड्रामा 'मद्रास कॅफे' (Madras Cafe) मध्ये कामं केलं. ज्याचे दिग्दर्शन शूजित सिरकार यांनी केले. डेव्हिड धवनच्या 'मैं तेरा हिरो' (Mein Tera Hero) या चित्रपटात वरुण धवनच्या सोबत तिनं काम केले आहे. टोनी डिसूझा दिग्दर्शित इमरान हाश्मी स्टारर 'अजहर' आणि साजिद फरहाद दिग्दर्शित अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 3' (Housefull 3) तसेच रितेश देशमुख स्टारर 'बँजो' असे काही चित्रपट तिने केले आहेत. 


सध्या ती क्रिश जगरलामुडी दिग्दर्शित तेलगू चित्रपट 'हरी हरा वीरा मल्लू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे.