मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गाजलेली जोडी म्हणून नर्गिस आणि राज कपूर यांच्याकडे पाहिलं जातं. नर्गिस आणि राज कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आरके बॅनर्सच्या लिडींग लेडी म्हणून नर्गिस यांची ओळख होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळानुरुप हे नातं बदललं आणि नर्गिस- राज यांच्या प्रेमाच्या चर्चांनी कलाविश्वात जोर धरला. विवाहित असूनही राज नर्गिस यांच्या प्रेमात होते. 


राज आणि नर्गिस यांची ओळख तेव्हा झाली, ज्यावेळी ते एका शो च्या कामानिमित्त डान्सर जद्दन बाई यांच्या घरी गेले होते. त्यावेळी नर्गिस यांनीच दार खोललं होतं. पहिल्या नजरेत राज कपूर त्यांच्या प्रेमात होते. 


राज कपूर यांच्यासाठी त्यांची पत्नीही तितकीच महत्त्वाची होती. पत्नी आपल्या मुलांची आई आहे, तर नर्गिस आपल्या चित्रपटांची आई आहे, असं ते नेहमी म्हणत होते. 


एके दिवशी राज आणि नर्गिस यांनी बाहेर जाण्याचा बेत आखला. नर्गिस तिथं राज कपूर यांची वाट पाहत होत्या असं म्हटलं गेलं. बराच वेळ झाला पण ते काही आले नाहीत. अखेर नर्गिस यांनी राज कपूर यांच्या घराचा रस्ता धरला. 


तिथे जाऊन पाहतात तर काय, सर्वत्र झगमगाट... राज कपूर यांच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नर्गिस तिथे गेल्या, पण राज मात्र त्यांना तिथे भेटले नाहीत. 


असं म्हटवलं जातं की त्यावेळी नर्गिस यांनी थेट राज कपूर यांचा बेडरुम गाठला. दार न वाजवताच त्या आत आल्या आणि पाहिलं, तर राज कपूर त्यांच्या पत्नीच्या गळ्यात हार घालत होते. 


पत्नीसोबत असणाऱ्या राज कपूर यांना पाहून नर्गिस शांत झाल्या आणि तिथून बाहेर निघाल्या. त्याच दिवशी नर्गिस यांना हे नातं पुढे जाऊ शकत नसल्याची जाणीव झाली. 


असं म्हणतात, की नर्गिस यांनी त्या क्षणाला राज कपूर यांच्याशी असणारी सर्व नाती तोडण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणापासून त्या राज कपूर यांना कधीच भेटल्या नाहीत.