तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खाता? आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम, एकदा वाचाच

Side Effects Dry Fruits: ड्रायफ्रुट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक उपयुक्त पोषकतत्वं आढळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण हे ड्रायफ्रुट्स सगळ्यांसाठीच फायदेशीर असतील असं नाही. 

Sep 30, 2024, 14:45 PM IST

Dry Fruits Disadvantages: तसे पहायला गेले तर ड्रायफ्रुट्स हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांनी ड्रायफ्रूट्सचे सेवन करू नये. कारण तसं केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

1/7

पण आपण नेहमी ऐकतो ड्राय फ्रूट्समध्ये अनेक पोषकतत्वं असतात आणि ते आपल्या शरीरासाठी लाभदायी असतात. पण असं असताना त्यापासून कोणाला त्रास कसा काय होऊ शकतो? तज्ञांच्या म्हणण्यानूसार प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते, त्यामुळे एखाद्या गोष्टीच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील पोषकतत्वांचं प्रमाण वाढून अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणी ड्रायफ्रूट्सचं सेवन करू नये? 

2/7

1. मधुमेहाचे रुग्ण

ड्रायफ्रूट्समध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषकतत्वं असतात. पण काही ड्राय फ्रूट्समध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्हाला अशा समस्या असतील तर ड्रायफ्रूट्स सेवन ताबडतोब बंद करा.

3/7

2. ज्यांना वजन कमी करायचे आहे

ड्रायफ्रुट्स आरोग्यदायी असतात पण त्यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅट्सही असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचं सेवन योग्य प्रमाणात करा किंवा वजन वाढवणाऱ्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू नका. साधारणपणे ड्रायफ्रुट्समध्ये 38-66 टक्के साखर असते आणि ते जास्त खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं. 

4/7

3. अ‍ॅलर्जी असणारे लोक

काही लोकांना ड्रायफ्रुट्सची अ‍ॅलर्जी असू शकते, जर ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला खाज सुटणे किंवा चक्कर येणे यासारखा त्रास झाला, तर ड्रायफ्रुट्स खाणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. ड्रायफ्रुट्स हे निसर्गतः उष्ण असल्याने त्याचा त्रास होऊ शकतो. 

5/7

4. पचना संबंधित समस्या

ड्रायफ्रुट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्यास पोट फुगणे, जुलाब, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी सारखा त्रास होऊ शकतो.

6/7

या शिवाय तुम्हाला इतर दुष्परिणामांनाही सामोरं जावं लागू शकतं. जसे की दातांच्या संबंधीत समस्या, किडनी स्टोन.

7/7

हे लक्षात ठेवा

ड्रायफ्रुट्सच मुळात गरम असल्यानं, त्याचे सेवन उन्हाळ्यात टाळा किंवा कमी प्रमाणात करा. हिवाळ्यात ड्राय फ्रुट्स खाणं  फायदेशीर ठरू शकतं, पण त्याच्या अति सेवनामुळे किंवा निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.