मुंबई : अभिनेत्री नयना मुके हिला 'फायनल डिसिजन' या व्यावसायिक मराठी नाटकातील भूमिकेसाठी  दादासाहेब फाळके फ्लिम फेस्टिवलच्या सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील मालाड येथे  हा पुरस्कार सोहळा पार पडला.  यावेळी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अनिल काकडे यांनी 'फायनल डिसिजन' या नाटकाचे लेखन - दिग्दर्शन केले आहे. देह दान या महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकामध्ये नयनाने साकारलेल्या  रेणुका या भूमिकेचे विशेष कौतुक अनेक रसिकांकडून करण्यात येत आहे.


लवकरच हिंदी सिनेमात


याआधी देवयानी, गणपती बाप्पा मोरया या मालिकांसोबतच गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनवट, संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा आदी चित्रपटांमध्ये नयनाने अनेक व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारल्या आहेत. लवकरच एका हिंदी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत नयना आपल्याला पाहायला मिळणार आहे.