Nayathara Romantic Photoshoot in Spain : साऊथ इंडियन अभिनेत्री नयनताराने आपले स्पेनमधील रॉमेण्टिक  फोटोशूट शेअर केले आहे. पती विघ्नेश शिवान सोबत तिने आपलं हे फोटोशूट इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. नयनतारा आणि विघ्नेश शिवन स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांचे हे रोमँटिक क्षण इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. किस वॉलसमोर पोज देतं त्यांनी हे रॉमेण्टिक फोटोशूट शेअर केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी नयनताराने पांढरा टँक टॉप, पांढरा शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट घातली होती तर विघ्नेशने पँट आणि स्ट्रीप शर्ट घातला होता. फोटोमध्ये हे जोडपं हातात हात घालून  स्पेनच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. शेवटच्या फोटोत त्यांनी डान्स पोज दिली.


नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी 9 जून रोजी एका लग्न केले. नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल नावाचा त्यांच्या लग्नाचा माहितीपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही डोक्यूमेंटरी गौतम वासुदेव मेनन यांनी दिग्दर्शित केली आहे. 



नयनतारा शाहरुख खानसोबत अॅटलीज जवानमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. त्याशिवाय गोल्ड, इरायवन, गॉडफादर, कनेक्ट आणि लेडी सुपरस्टार 75 या चित्रपटातूनही महत्त्वाच्या भुमिका निभावणार आहे.