मुंबई : तुम्ही चिखलात पडल्यावर काय कराल? आधी त्यातून बाहेर पडाल, नाही का? आता आणखी एक विचार करा, जर तुमच्या अंगावर कोणी चिखल लावला तर? फोटोसाठी पोज द्याल? नाही .... हेच तुमचं उत्तर असेल. (actress nicole scherzinger took mud bath see photos)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, या अभिनेत्रीनं चक्क अंगभर चिखल फासलेला असतानाही फोटोंसाठी पोज दिली आणि सर्वांनाच हैराण केलं. 


बरं, सोशल मीडियावर तिनं काही फोटोही शेअर केले. जिथं ती बिकीनीमध्ये दिसत असून, तिच्या अंगावर सर्वत्र चिखल लागल्याचं दिसत आहे. 


ही अभिनेत्री आहे, nicole scherzinger. निकोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. काहीही शेअर केल्यास ती पोस्ट क्षणार्धात चर्चेत येते इतकी तिची लोकप्रियता. 



तुम्हाला माहितीये का, निकोल चिखलात पडली वगैरे नाहीये. सध्या ती स्पेनमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. जिथं तिनं मड बाथ थेरेपी घेतली. या प्रक्रियेमध्ये माती- चिखल संपूर्ण शरीरावर लावला जातो. असं म्हणतात की असं केल्यामुळं त्वचेचे विकार, व्याधी दूर होतात. त्वचा पुन्हा अधिक टवटवीत दिसू लागते. 


मड बाथच्या या अनुभवानंतर निकोलनं काही फोटो शेअर केले जिथं ही प्रक्रिया नेमकी काय असते याचा पाहूनच अंदाज आला. 'गेटिंग डाउन एंड डर्टी' असं कॅप्शन तिनं या पोस्टला लिहिलं.