मुंबई : 'मेरे पास मां है' या लोकप्रिय डायलॉगमुळं अभिनेत्री निरुपा रॉय यांचा चेहरा घराघरात पोहोचला. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये विशेषत: 'आई', च्या भूमिका गाजल्या. चित्रपटांमध्ये अशी आई आजवर झाली नाही, असंच प्रेक्षकांचं आणि बऱ्याच कलाकारांचंही म्हणणं. (Bollywood)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्वीन ऑफ मिसरी' (Queen Of Misery) अशी त्यांची ओळख भारतीय चित्रपटांमध्ये करण्यात येते. 


जिथं रुपेरी पडद्यावर निरुपा रॉय यांनी आईची भूमिका लिलया पेलली, तिथंच त्यांच्या मुलांकडून त्यांना मिळालेल्या वेदना शब्दांतही व्यक्त करण्यात येणार नाही अशाच आहेत. 


'अमर अकबर एंथनी', 'दीवार' अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 


कठीण प्रसंग आणि परिस्थितीचा सामना केल्यानंतर रॉय यांनी 1963 मध्ये मुंबईतील नेपियन सी रोड इथं 10 लाख रुपयांना एक घर खरेदी केलं. 


आज त्या घराची किंमत कोट्यवधींवर पोहोचली आहे. निरुपा रॉय यांना यश, संपत्ती, आलिशान घर असं सर्वकाही मिळालं. पण, चित्रपटांमध्ये दाखवलं जात होतं असं मुलांचं प्रेम मात्र त्यांना मिळू शकलं नाही. 


2004 मध्ये निरुपा रॉय यांच्या निधनानंतर त्यांची मुलं किरण आणि योगेश यांच्यामधील वाद पेटला. 2015 मध्ये रॉय यांच्या पतीच्या निधनानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला. 


100 कोटी रुपये इतकी किंमत असणाऱ्या या संपत्तीमध्ये अगदी बेडरुन आणि गार्डनपासूनचा वाद चव्हाट्यावर आला, ज्यानं सर्वजण हैराण झाले. 



किरणनं माध्यमांशी संवाद साधताना आईनं सर्व संपत्ती आपल्या नावे केल्याचं सांगितलं. शिवाय दुसरा फ्लॅटही आपल्याच नावावर केल्याचं सांगितलं. 


दुसरा भाऊ, योगेश आणि त्याची पत्नी आई- वडिलांसी अयोग्य पद्धतीनं वागत होते असं कारण पुढे करत मी एकटाच संपत्तीचा वारसदार असल्याचं किरणनं सांगितलं. 


प्रत्यक्षात योगेशनं आपल्या आई- वडिलांशी गैरव्यवहार करत त्यांना शारीरिक वेदनाही दिल्याचा खळबळजनक खुलासा किरणनं म्हणजेच रॉय यांच्या मुलानं केला होता. 


मी आईच्या निधनानंतर वडिलांची काळजी घेतली आणि त्यांचीच इच्छा होती की, मी बेडरुममध्ये रहावं. त्यांनी कुटुंबीयांना अशी ताकिदही दिली होती असा खुलासा रॉय यांच्या मुलानं केला होता. 


रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीची ही अवस्था सर्वांच्याच मनात कालवाकालव करुन गेली.