``मी सेलिब्रेटी आहे म्हणून...`` शॉपिंग करताना निवेदिता सराफ यांना आला कटू अनुभव
Nivedita Saraf Shopping Mall News: अनेकदा मोठमोठ्या दुकानांमध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळे अनुभव येताना दिसतात. कधी ते चांगले असतात तर कधी वाईट. सध्या अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिले आहे.
Nivedita Saraf Shopping Mall News: शॉपिंग करणं हे प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु अनेक कुठल्यातरी दुकानात गेल्यावर आपल्याला विचित्र अनुभवही येताना दिसतात. कधी विक्रेते ग्राहकांची नीट वागत नाहीत तर इतर ग्राहकांकडूनही आपल्याला वेगळाच अनुभव येतो. कधी विक्रेते आपल्याशी नीट बोलत नाहीत, पोडक्ट्स नीट दाखवत नाही, माहिती देत नाहीत त्याचसोबत ग्राहकांशी नीट सहकार्य करत नाहीत त्यामुळे ग्राहकांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये बाताबातीही होते. हल्ली असे अनेक व्हिडीओजही सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. ग्राहक आपली नाराजीही आता थेट नोंदवू शकतात. एक ग्राहक म्हणून आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. परंतु त्यातूनही अनेकदा आपल्याला वाईट अनुभवही सहज येताना दिसतात.
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे नावं आगत्यानं घेतलं जातं. त्यांची लोकप्रियताही अफाट आहे. सध्या त्या टेलिव्हिजन सिरियल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहेत. त्यांच्या भुमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे आणि त्यांच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. सोबतच त्यांची अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील भुमिकाही प्रचंड गाजली, जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. निवेदिता सराफ या इन्टाग्रामवरही प्रचंड सक्रिय असतात. सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आपल्याला मॉलमध्ये आलेल्या अशाच एका वाईट अनुभवाबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात आपली भुमिका मांडली आहे.
हेही वाचा - रूपेरी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकीची ट्रान्सजेंडर भुमिका, इतके तास चालायचा मेकअप, पाहा VIDEO
त्या म्हणाल्या की त्या एका मॉलमध्ये होत्या. तेथील स्टाफकडून त्यांना फार वाईट अनुभव आला. तुम्ही काही खरेदी करताय किंवा नाही याची त्यांच्यापैंकी कुणालाच काही पर्वा नव्हती. तेवढ्यात एक मुलगी बाहेर आली आणि दुसऱ्या एका सेल्सपर्सनल मी बिझी आहे, मला वेळ नाही असं सांगून निघून गेली. एका व्यक्तीनं त्यांना ओळखलं आणि मॅनेजर यांना बोलावलं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की त्यांना फक्त मी सेलिब्रेटी आहे म्हणूनच चांगली वागणूक नकोय. मला एक सामान्य ग्राहक म्हणून चांगली ट्रीटमेंट हवी आहे. मी त्यासाठी पात्र आहे. फक्त मीच नाही तर प्रत्येक ग्राहकांना अशी ट्रीटमेंट मिळायला हवी.
सध्या त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत आणि आपल्यालाही आलेल्या अनुभवांबद्दल शेअर करताना दिसत आहेत. सध्या त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. निवेदिता सराफ सध्या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्या युट्यूबवरही सक्रिय आहेत आणि आपल्या चॅनलवरून त्या नानाविध चविष्ट रेसिपींचे व्हिडीओज शेअर करताना दिसतात.