मुंबई : सोशल मीडिया पोस्ट असो किंवा मग एखादा  नवा लूक, अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही कायमच चर्चेत असते. नोरा चर्चेत येण्यास तिचं साधं इन्स्टा स्टेटसही पुरेसं असतं. हल्लीच तिला नियॉन रंगातील कपड्यांचा लूक चाहत्यांनी पसंत केला, त्याची बरीच हवा पाहायला मिळाली. पण, आता हीच नोरा म्हणे संतापलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये नोराचं हे संतप्त रुप पाहायला मिळत असून ती रागाच्या भरात एका कारवर पाणी ओतताना दिसत आहे. सुरुवातीला तिचं हे रागीट रुप पाहून काहींना तर ही नोरा आहे यावरच विश्वास बसत नाहीये. 


एका फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये नोरा नेमकी का रागवलीये हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे. 'त्यांना वाटतंय की मी बॉलिवूडमध्ये जाऊन बदलली, पण असं नाहीये...' असं म्हणत ती थेट कारवरच पाणी ओततताना दिसतेय. नोराला असं करण्यापासून तिचे मित्रमंडळी थांबवताना दिसत आहेत. 




मोठ्या प्रोजेक्टसाठी नोराची वर्णी 
नोरा फतेही (Nora Fatehi Instagram) नं 'दिलबर' आणि 'गर्मी' यांसारख्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यानंतरही तिनं आपल्या विविध गाण्यांवर चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडल्याचं पाहायला मिळालं आहे.