Nupur Alankar Viral Video: टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या नुपूर अलंकार (Television Actress Nupur Alankar) या अभिनेत्रीनं सगळ्यांपासून दूर जात संन्यास पत्करला आहे. गेल्या महिन्याभरापुर्वीच या अभिनेत्री आपल्या आयुष्याबद्दल हा मोठा निर्णय घेतला आहे (Television Actress Nupur Alankar devotion) . तिच्या म्हणण्यानुसार तिनं हा जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य घेतला आहे. या निर्णयासोबतच तिनं आपल्या संपत्तीचा, प्रसिद्धीचा त्याग केला असल्याचेही तिनं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुपूर अलंकार या अभिनेत्रीनं गेली तीन दशकं टेलिव्हिजन क्षेत्रात काम केलं आहे. ती रणबीर कपूर आण सोनम कपूरच्या सावरियाँ (Ranbir Kapoor and Sonam Kapoor Sawariyya) या चित्रपटातही काम केलं आहे आणि त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांतूनही (Nupur Alankar Television Serials) काम केलं आहे.आता सध्या ही अभिनेत्री काय करतेय ती कसं आयुष्य जगतंय, कुठे राहतेय याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल. समोर आलेल्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओ या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे. (Nupur Alankar Viral Video)


मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे नुपूर यांच्या आईची तब्येत बिघडली होती. तेव्हा आपल्या आईच्या उपचारांसाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तिला आर्थिक मदतीची गरज होती. तिनं तिच्या ओळखीच्या काही लोकांकडे पैसे मागायला सुरूवात केली होती. परंतु दुर्देवानं तिच्या आईचं निधन झालं. (Nupur Alankar Mother)


या धक्क्यामुळे नुपूर यांनी आपल्या आयुष्याकडे वेगळ्या तऱ्हेने पाहण्याचा प्रयत्न केला आणि आयुष्यात ज्या गोष्टीला आपण वाचावण्याचा प्रयत्न करतो जी आपण गमावून बसू अशी भिती आपल्याला असते तेव्हा ती गोष्ट, व्यक्ती, वस्तू आपल्या आयुष्यातून निघून जाते. 


तेव्हा या धारणेनं तिनं आपल्या जीवनाची एक नवीन सुरूवात करत हिमालयस्थित एका आश्रम जाण्याच्या निर्णय घेतला आणि संन्यास स्विकारला. संन्यास स्विकारणाऱ्या नुपूरला आता भक्तीरसात मंत्रमुग्ध झालेलं पाहायला मिळत आहे. तिचा नुकताच असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती एका देवळात दिसत असून ताळ्या वाजवत गोल फिरताना ती दिसते आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नुपूर यांनी आपल्या पतीपासूनही घटस्फोट घेतला आहे. (Nupur Alankar Divorce)