मुंबई : काही अभिनेत्री त्यांच्या कारकिर्दीत अशा काही प्रकाशझोतात येतात की, उतरत्या वयातही चाहत्यांच्या कायमच स्मरणात राहतात. अशाच अभिनेत्रींपैकी एका रुपवान सौंदर्यवतीनं तिच्या कारकिर्दीत सर्वांच्यात नजरा वळवल्या होत्या. चित्रपटांमधील भूमिकांपासून ते अगदी काही बड्या सेलिब्रिटींशी असणाऱ्या नात्यापर्यंत अनेक कारणांनी ही अभिनेत्री चर्चेत आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशाच्या पायऱ्या चढत असतानाच ती एका चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली. वयाच्या 21 व्या वर्षी कुटुंबाकडून होणारा विरोध पत्करुन तिनं पळून जाऊन लग्न केलं. ही अभिनेत्री होती, पद्मिनी कोल्हापुरे आणि ते निर्माते होते प्रदीप शर्मा. 


पद्मिनीनं 15 व्या वर्षीच चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. 21 व्या वर्षी 'ऐसा प्यार कहाँ' या चित्रपटाच्या सेटवर प्रदीपशी तिची पहिली ओळख झाली. पण, या नात्यावर पद्मिनीच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. 


दोघंही वेगवेगळ्या जातींचे असल्यामुळं हा विरोधा वाढतच चाललेला. मनधरणी करुनही पद्मिनीच्या कुटुंबाचा विरोध मावळेना. शेवटी त्यांनी पळून जात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 



पद्मिनी कोल्हापुरे ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भाची आहे. हे नातंही त्यांना वेगळीच ओळख देऊन गेली. पद्मिनीचं नाव काही वादग्रस्त प्रसंगांच्या वेळीही घेतलं गेलं. त्यापैकीच एक किस्सा आजही आठवला जातो.



1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या आजुबाजूला सर्वत्र अभेद्य सुरक्षा कवच होतं. पण, पद्मिनी यातूनच पुढे गेली आणि त्यांना किस केलं. खुद्द चार्ल्स यांच्यासाठीही हे सारं अनपेक्षित होतं. दुसऱ्याच दिवशी भारतीय वृत्तपत्रांसह परदेशी वर्तमानपत्रांमध्येही यासंदर्भातले फोटो छापून आले आणि अनेक दिवस हा किस्सा चर्चेत राहिला. असं काहीतरी केल्यामुळं पद्मिनीला काहीजणांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.