75 हजारांच्या स्कूटरचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ; 49 टक्के बाजारपेठ घेतली ताब्यात

ओला इलेक्ट्रिकने मे महिन्यातील विक्रीचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यानुसार कंपनीने मे महिन्यात एकूण 37 हजार 191 युनिट्सची विक्री केली आहे.   

Jun 01, 2024, 17:33 PM IST

ओला इलेक्ट्रिकने मे महिन्यातील विक्रीचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यानुसार कंपनीने मे महिन्यात एकूण 37 हजार 191 युनिट्सची विक्री केली आहे. 

1/9

भारतीय बाजारपेठेत आता एकापेक्षा एक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. बाजारपेठेत प्रत्येक महिन्याल नवी इलेक्ट्रिक स्कूटर सादर होत आहे.   

2/9

पण बाजारात नव्या कंपन्या आल्या तरी OLA Electric भक्कमपणे उभी आहे. कंपनीने जवळपास अर्धी बाजारपेठ आपल्या ताब्यात ठेवली आहे.   

3/9

ओला इलेक्ट्रिकने मे महिन्यातील विक्रीचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. यानुसार कंपनीने मे महिन्यात एकूण 37 हजार 191 युनिट्सची विक्री केली आहे.   

4/9

हा आकडा सरकारी वाहन पोर्टलनुसार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यासह बाजारपेठेत ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर 49 टक्के झाला आहे.   

5/9

ओला इलेक्ट्रिकच्या पोर्टफोलिओत S1 रेंजमघ्ये वेगवेगळ्या स्कूटर आहेत. यामधील सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 74 हजार 999 रुपये आहे.   

6/9

Ola S1 X रेंजमध्ये तीन वेगवेगळे बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. याचं लोअर व्हेरियंट 95 किमी आणि हायर व्हेरियंट 190 किमीची रेंज देतो.   

7/9

S1 X च्या हायर व्हेरियंटची किंमत 99 हजार 999 रुपये आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 190 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.   

8/9

याशिवाय Ola S1 Air व्हेरियंटची किंमत 1,06,499 रुपयांपासून सुरु होते. ही सिंगल चार्जमध्ये 151 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.   

9/9

Ola S1 Pro च्या सेकंड जनरेशन मॉडेलची किंमत 1,32,499 रुपये आहे. ही स्कूटर सर्वाधिक 195 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. लूक आणि डिझाईनमध्ये या सर्व स्कूटर जवळपास सारख्याच आहेत.