मुंबई : ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. राणी एलिझाबेथ यांनी 70 वर्षांहून अधिक काळ ब्रिटन आणि संबंधित देश आणि वसाहतींवर राज्य केलं आता राणींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स (King Charles) यांना राजा बनवले जाणार आहे.राणी एलिझाबेथसोबतच प्रिन्स चार्ल्स यांचाही भारतासोबत अतूट संबंध आहे. प्रिन्स चार्ल्स देखील अनेकदा भारतात आले. पण प्रिन्स चार्ल्स एकदा भारतात आल्यानंतर एक रंजक घटना त्यांच्यासोबत घडली. ती रंजक घटना म्हणजे जेव्हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (padmini kolhapure) प्रिन्स चार्ल्स यांना किस केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिन्स चार्ल्स आणि  पद्मिनी कोल्हापुरे (padmini kolhapure) यांचा किसिंगचा किस्सा आजही चर्चेत आहे. जवळपास 40  वर्षांपूर्वी प्रिंस चार्ल्स मुंबईत आले होते. तेव्हा  प्रिंस चार्ल्स भारतात सिनेमांची शूटींग कशी होते, पाहण्यासाठी 'आहिस्ता आहिस्ता' सिनेमाच्या सेटवर पोहचले.



1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या आजुबाजूला सर्वत्र अभेद्य सुरक्षा कवच होतं. पण, पद्मिनी यातूनच पुढे गेली आणि त्यांना किस केलं. खुद्द चार्ल्स यांच्यासाठीही हे सारं अनपेक्षित होतं. दुसऱ्याच दिवशी भारतीय वृत्तपत्रांसह परदेशी वर्तमानपत्रांमध्येही यासंदर्भातले फोटो छापून आले. (padmini kolhapure and King Charles kissing video)


दरम्यान एका वेब साईटने पद्मिनी यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर ती म्हणाली, 'तेव्हा प्रिन्स चार्ल्स मुंबईत होते आणि त्यांच्या मनात काय आले ते मला माहित नाही. ते शूटिंग पाहायला सेटवर आले. तेव्हा आम्ही राजकमल स्टुडिओत शूटिंग करत होतो. शशिकला यांनी आरती करून त्यांचं स्वागत केलं तेव्हा मी त्यांच्या गालाला किस केलं. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती. ' (Prince Charles is British throne's next King)


पद्मिनी पुढे म्हणाली, 'मी जेव्हा लंडनमध्ये गेली तेव्हा तिथल्या एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने मला तुम्हीच प्रिन्स चार्ल्सला किस केलं होत? असा प्रश्न विचारला.' तेव्हा अनेक दिवस हा किस्सा चर्चेत राहिला.  प्रिन्स चार्ल्सला किसला किस केल्यामुळे पद्मिनीला अनेकांच्याटीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.