आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या `या` प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट
Parineeti Chopra Struggle Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) येणं काही सोप्पं नाही सोबतच येथे यशस्वी अभिनेत्री होणंही सोप्पं नाही. सध्या अशीच एक कहाणी आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीची, जिनं एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर परदेशात शिक्षण आणि नोकरी केली होती. परंतु आर्थिक मंदीमुळे (Recession News) ती परत भारतात आली आणि तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती.
Parineeti Chopra Struggle Story: अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra and Raghav Chaddha) यांच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आलं आहे. आजकाल ते एकमेकांसमवेत वेळ घालवताना दिसत आहेत. त्याचबरोबर येत्या काही दिवसांतच त्यांचे लग्न संपन्न होईल अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. नुकतेच ते दोघे एकत्र क्रिकेट मॅच पाहायला गेले असताना स्पॉट झाले. त्यामुळे त्या दोघांबद्दल चर्चा जोरात सुरू झाली होती.
आता ते अनेकदा एकत्र स्पॉट (Parineeti Chopra and Raghav Chaddha Spotted) होतानाही दिसत आहेत. राघव आणि परिणिती एकत्र कधी, कुठे आणि केव्हा भेटले याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे त्याचसोबत ते कधी लग्न करणार याबद्दलही त्यांच्याच प्रचंड उत्सुकता आहे. (actress parineeti chopra came to bollywood after recession in country where she used to study)
परिणिती चोप्रा ही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकांसाठी ओळखली जाते. प्रियंका चोप्राची बहीण म्हणूनही परिणितीची ओळख आहे परंतु तुम्हाला माहितीये का परिणिती चोप्रा ही नक्की बॉलिवूडमध्ये कशी आणि कधी आली? परिणिती चोप्रानं आपल्या स्ट्रगलबद्दल (Parineeti Chopra Interview) अनेकदा मुलाखतीतून भाष्य केलं आहे. एकेकाळी आपल्याकडे पैसे नव्हते त्याचप्रमाणे आपल्याशी बोलायला कोणी मित्र-मैत्रीणीही नव्हते, असंही तिनं आपल्या एका मुलाखतीतून सांगितले होते. सध्या राघव चड्ढासोबतच्या लिंकमुळे परिणिती चोप्रा सध्या चर्चेत आली आहे. परंतु तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की नक्की परिणिती चोप्रा ही बॉलिवूडमध्ये कशी आली?
म्हणून सोडला परदेश
परिणिती चोप्रा हिनं 'रॉकी वर्सेस रिकी बेल' या चित्रपटातून कमबॅक केले होते. परंतु त्याआधी ती परदेशात उच्च शिक्षण घेत होती. मॅनचेस्टर येथे ती बिझनेस, फायनान्स आणि अर्थशास्त्र या विषयातून ट्रिपल हॉनर्सची पदवी घेत होती. त्यानंतर तिनं परदेशात इन्व्हेसमेंट मॅनेजरची नोकरी करत होती. परंतु 2009 साली आर्थिक मंदी (Recession) आल्यामुळे तिनं परत भारतात येण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती.
हेही वाचा - ''बनारसच्या घाटावर तासनतास मृतदेह जळताना पाहायचो'', Vicky Kaushal नं सांगितलेला 'तो' अनुभव
अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
तिनं बॉलिवूडच्या तिच्या सुरूवातीच्या काळात अभिनेत्री राणी मुखर्जीची असिस्टंट (Rani Mukherji Parineeti Chopra) म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर तिनं राणी मुखर्जीच्या सल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला होता आणि अशाप्रकारे तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती. त्यामुळेच तिची यश राज फिल्म्समध्ये एन्ट्री झाली.