मुंबई : सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स असणाऱ्या आणि मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे हिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. Poonam Pandey हिनं काही दिवसांपूर्वीच फारसा गाजावाजा न करता प्रियकर सॅम बॉम्बे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पण, आता मात्र त्यांच्या नात्यात वादळ आल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नबंधनात अडकल्याचं जाहीर केल्यानंतर जवळपास अवघ्या दोन आठवड्यांनंतरच आता खुद्द पूनमनं पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सॅमकडून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं तिनं या तक्रारीत म्हटलं आहे. 


सॅम बॉम्बे आहे तरी कोण? 


दुबईमध्ये जन्मलेला सॅम हा एक ऍडफिल्म निर्माता आहे. ३६ वर्षीय सॅमनं आतापर्यंत अक्षय कुमार, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, जॅकलिम फर्नांडिस, तमन्ना भाटीया, अल्लू अर्जुन या कलाकारांसोबत काम केलं आहे. इतकंच नव्हे, तर विराट कोहली आणि युवराज सिंह या खेळाडूसहसुद्धा त्यानं काम केलं आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार सॅमनं ओपो, स्पार्क्स, ऍमेझॉन अशा प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींसाठीसुद्धा काम केलं आहे. 



 


नेमकी अटक का झाली ?


गोव्यातील कॅनकोवा येथे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. जेथे पूनम तिच्या एका जाहिरातीचं चित्रीकरण करत होती. पूनमच्याच तक्रारीनंतर सॅमला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. पतीनं छळ केल्याचं म्हणत त्याच्यावर पूनमनं मारहाणीचे गंभीर आरोप केले. पूनमनं केलेल्या आरोपांची निश्चितता अद्यापही झालेली नाही, त्यामुळं या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.