Prajakta Gaikwad Degree News: आता अभिनेत्री या फक्त अभिनयात पारंगत नसून त्या शैक्षणिक क्षेत्रातही आपलं नशीब आजमावताना दिसत आहे. उच्चशिक्षण हे सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अभिनेत्रीही आपल्या शिक्षणासाठी धडपड करताना दिसत आहेत. अशा अनेक अभिनेत्रींची उदाहरणं आहेत ज्यांनी अभिनयाला ब्रेक दिला आणि आपलं उच्चंशिक्षण घेण्यासाठी परदेशात नाहीतर मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वेळोवेळी कौतुकही झाले आहे. आता अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे जिनं शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे नावं कमावले आहे. तिनं फार मोठ्या क्षेत्रात पदवी मिळवली आहे. तिनं आंभियांत्रिकीत पदवी मिळवली असून यावेळी तिनं तिची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती प्राजक्ता गायकवाड आहे. प्राजक्ता गायकवाड ही 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरातून पोहचली होती. तिचे इन्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आताही तिनं पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिची जोरात चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं एक फोटो पोस्ट केला आहे जो एका मोठ्या आणि प्रतिष्ठित कॉलेजच्या बाहेरचा आहे. यावेळी साडी, पारंपारिक कपडे वा कोणतेही फॅशनेबल कपडे तिनं परिधान केलेले नसून यावेळी ती फॉर्मल कपड्यांमध्ये दिसते आहे. यावेळी तिनं कॉट आणि पॅन्ट घातली आहे आणि गळ्यात आयडी घातला आहे. यावेळी की कॉलेजच्या दीक्षान्त सभारंभाला पोहचली आहे. 


हेही वाचा - 'बाईपण भारी देवा'च्या यशावर वंदना गुप्तेंचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या, 'आम्ही शाहरूख-सलमानलाही...'


तिच्या या ब्लेझरवर तिच्या युनिव्हर्सिटीचा लोगो आहे. त्यामुळे तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी तिनं खुलासा केला आहे की तिनं कॉम्यूटर इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली असून ती आता इंजिनियर झाली आहे. यावेळी तिनं पोस्ट करत लिहिलं आहे की, ''कॉम्प्युटर इंजिनिअरींग शिक्षण (Computer Engineering) पूर्ण केले. डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. ( CGPA : 8.77 ), इंजिनिअर अभिनेत्री'', अंस तिनं कमेंटमध्ये लिहिलं आहे. तेव्हा तिच्या या पोस्टखाली चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 



मध्यंतरी प्राजक्ता काही मालिकांमधून दिसली होती. आता ती लोकप्रिय अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.