मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणी येसूबाई म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हीचे. प्राजक्ता गायकवाडने जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. प्राजक्ता एवढ्यावरच थांबली नाही तर तिने तब्बल 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आहे. सध्या या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात तिने खंडोबांचं दर्शन घेतलं. प्राजक्ताने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 



प्राजक्ताने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. मराठमोळी वाघिण, जिजाबाईंची लेक अशी प्रतिक्रिया देऊन कौतुक केलं आहे. 



"आपल्या भोवती कोरोनाचा अंधार दाटला असला तरीदेखील घाबरू नका. स्वतः वर विश्वास ठेवा. जगाचा पोशिंदा असलेल्या त्या शेतकऱ्याकडे बघा. कितीही संकटं आली तरी तो कधीच थांबत नाही. म्हणूनच आपण जगू शकतो", असं कॅप्शन देत प्राजक्तानं हा फोटो शेअर केला आहे.