मुंबई : झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सध्या एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्राजक्ताचा चर्चेत असणारा हा व्हिडिओ वारीतला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीच्या वाटेवर निघाली आहे. एवढंच नव्हेतर यावेळी प्राजक्ताने टाळांच्या गजरावर ठेकाही धरला.  प्राजक्तानं तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भक्तांच्या मंदियाळीत आळंदी आणि पंढरपूर गजबजून गेलं आहे. अनेक भाविक पंढरपूरात दाखल होत आहेत. मराठीतीली काही प्रसिद्ध कलाकारांनीही विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे. 


वारीत सहभागी झालेली प्राजक्ता पारंपरिक वेशात दिसली. जांभळ्या रंगाची इरकली साडी कपाळी काळा गंध आणि नारंगी टिळा लावून  प्राजक्ता दिसली वारीत दंग होताना दिसली. प्राजक्ताचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला. 'वारीच्या वाटेवर या फोटोला कॅप्शनची गरज नाही. आतापर्यंतचा सगळ्यात भारी फोटो', असं कॅप्शन देत प्राजक्तानं  वारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्राजक्ता पुण्यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. तिथं तिनं तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. इतकंच नाही टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला. दोन वर्षांनंतर वारीचा पुरेपूर आनंद लुटताना प्राजक्ता दिसली. प्राजक्ताच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.