बांगलादेशवर धमाकेदार विजय, WTC ची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागणार?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली गेली. यात मंगळवारी कानपुर येथे झालेला सामना टीम इंडियाने ७ विकेट्सने जिंकला. सीरिजमध्ये २-० ची आघाडी घेऊन टीम इंडियाने टेस्ट सीरिज सुद्धा नावावर केली. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंटेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. 

| Oct 01, 2024, 18:38 PM IST
1/8

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला. हा सामना टीम इंडियाने 280 धावांनी जिंकून बांगलादेशचा धुव्वा उडवला. यासह भारताने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी सुद्धा घेतली होती. 

2/8

दुसरा टेस्ट सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. या सामन्याचे पहिले तीन दिवस हे पावसामुळे वाया गेले. पहिल्या दिवशी केवळ 35 ओव्हरचा सामना झाला ज्यात भारताने बांगलादेशकच्या 3 विकेट्स घेतल्या तर बांगलादेशच्या फलंदाजांनी 107 धावांची खेळी केली.   

3/8

दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही बॉल खेळवला न जाता सामना रद्द करण्यात आला. चौथ्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला 233 धावांवर रोखले.  टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघाडी मोडीत काढून 285 धावा केल्या. बांगलादेशने चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारताची आघाडी मोडून विजयासाठी भारताला 95 धावांचे लक्ष दिले. हे लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पूर्ण केले.  

4/8

भारताने बांगलादेशवर मिळवलेल्या या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये सुद्धा त्यांना मोठा फायदा झाला. या पॉईंट टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023-2025) च्या सायकलमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 11 टेस्ट सामने खेळले असून यापैकी 8 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर केवळ 2 टेस्ट सामन्यात त्यांचा पराभव आणि एक सामना टाय झालाय. भारताच्या विजयाची टक्केवारी 74.24 टक्के इतकी आहे. 

5/8

कानपुर टेस्टपूर्वी भारताच्या विजयाची टक्केवारी ही 71.67 इतकी होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची  फायनल गाठण्यासाठी भारताला आता 8 टेस्ट सामन्यापैकी 4 टेस्ट सामने जिंकावे लागतील.   

6/8

बांगलादेश टेस्ट सीरिजनंतर भारत न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला 8 टेस्ट सामन्यापैकी 5 सामने जिंकावे लागतील.   

7/8

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया ही WTC फायनलची एक महत्वाची दावेदार असून 12 टेस्ट पैकी त्यांनी 8 टेस्ट सामने जिंकून त्यांच्याकडे 90 पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 62.50 टक्के इतकी आहे. तर श्रीलंका सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना टफ देत असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 55.56 आहे. 

8/8

11 जून 2025 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची  फायनल होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकले आहे. आता रोहितचे टार्गेट भारताला टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून देणे असेल.