मुंबई : प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेतील तिच्या आभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकताच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर हास्यजत्रा या शोच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. प्राजक्ताला सुत्रसंचालनाच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आपला  34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कधी पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी तिचा सोज्वळपणा तिच्या चाहत्यांना भावतो तर कधी ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला प्राजक्ताच्या बोल्ड सीनबद्दल सांगणार आहोत. जो खूप चर्चेत होता. प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झालेली रानबाजार ही वेबसिरीज २०२२ मध्ये मराठीतील सर्वात चर्चेत असणाऱ्या वेबसिरीजपैकी एक होती. या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताला बोल्ड अंदाजात पाहून सगळेच हैराण झाले होते.


सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळाली होती. ही वेबसिरीज भेटीला येताच अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. काहींनी प्राजक्ताच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं तर काहींना मात्र प्राजक्ताला बोल्ड अंदाजात पाहून अनेक चाहते तिच्यावर भडकले होते. अनेकांनी प्राजक्ताला ट्रोलही केलं होतं. 


मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार  प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्या वेबसिरीजला डोक्यावर घेतलं होतं.  या वेबसिरीजचे सगळे एपिसोड प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या वोबसिरीजनंतर प्राजक्ता आणि तेजस्विनी चर्चेत आहेत. याच बरोबर या सिरीजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं कौतूक केलं होतं. 


काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये फार्म हाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ताने सोशल मीडियावर या फार्म हाऊसचे काही फोटो आणि व्हिडिओही शेअऱ केले होते. प्राजक्ताचं हे फार्म हाऊस  कर्जतमध्ये आहे. फार्महाऊसच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे. या फार्महाऊसला तिने 'प्राजक्तकुंज' असं नाव दिलं आहे. याचबरोबर प्राजक्ताचा दागिन्यांचा ब्रँण्ड देखील आहे. ज्याचं नाव प्राजक्तराज असं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आत्ता पर्यंत प्राजक्ताने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. प्राजक्ताचं सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.  अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' पासून सुरू झालेला हा प्रवास 'पांडू', 'पावनखिंड', 'लकडाउन','वाय' सारख्या चित्रपटांवर येऊन ठेपला. त्यामुळे अभिनयासोबतच सध्या अभिनेत्री व्यवसायातही प्रचंड व्यग्र आहे.