राखीवर कुत्र्याने घेतली धाव, विचित्र ड्रेस पडला महागात
राखीने `संडे का वार`मध्ये करण जोहरसोबत स्टेज शेअर केला.
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत बऱ्याचदा तिच्या चित्रविचित्र अंदाजामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती 'बिग बॉस ओटीटी'च्या सेटवर खास गेस्ट म्हणून पोहोचली. राखीने 'संडे का वार'मध्ये करण जोहरसोबत स्टेज शेअर केला. याआधी राखीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ती फ्रिल ड्रेस घालून सेटच्या आत जाताना दिसत होती.
यावेळी ड्रेस सांभाळत आत जात असताना तिच्या मागे दोन कुत्रे लागले होते. यावेळी राखी सावंतचा दावा आहे की तिला कुत्र्याने चावा घेतला आहे, यामुळे ती दोन दिवस घरी विश्रांती घेत होती.
राखी फोटोग्राफर्संना संपूर्ण प्रकार सांगताना दिसली. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राखी सांगत आहे की मी घरी विश्रांती घेत आहे, कारण मी घातलेला ड्रेस पाहून कुत्रे माझ्या मागे लागले आणि त्यांनी मला चावले.
व्हिडिओ शेअर करताना राखीने कॅप्शनमध्ये लिहिले, "अरे, मला काय होत आहे, मला इंजेक्शन घ्यावे लागतील. कुत्र्याने मला चावले आहे, आता मी त्यांना चावेन."