Rakul Preet Singh Injured: बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अभिनयासोबत आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसत असतात. अनेक अभिनेत्री जिममध्ये वर्कआउट करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंगबद्दल एक बातमी समोर आली आहे. रकुल प्रीत सिंगसोबत जिमध्ये वर्कआउट करताना एक घटना घडली आहे. ज्यामध्ये ती जखमी झाली आहे. यानंतर रकुल प्रीत सिंगला बेडरेस्टवर जावे लागले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रकुल प्रीत सिंगचा निष्काळजीपणा पडला महागात 


मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही 5 ऑक्टोबर रोजी जिममध्ये वर्कआउट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने बेल्ट न लावता 80 किलो वजन उचलले. दरम्यान, यावेळी तिला जखम झाली. यानंतर रकुल प्रीत सिंगची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी सध्या अभिनेत्रीला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. यानंतरही अभिनेत्री पेनकिलर घेऊन 'दे दे प्यार दे' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सततच्या शूटिंगमुळे तिला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर अभिनेत्रीने या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची तब्येत आणखी बिघडली. 



डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रकुल प्रीत सिंगला दुखापतीमुळे L4, L5 आणि S1 नसा ब्लॉक झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी अभिनेत्रीला काही औषधे आणि इंजेक्शन दिले आहेत. आता अभिनेत्री तब्येत पूर्वीपेक्षा चांगली होत असल्याचं म्हटलं जात आहे. 


रकुल प्रीत सिंगचा आगामी चित्रपट


अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा 'दे दे प्यार दे' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. सध्या अभिनेत्री रकुल प्रीत सिंग या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासोबत अभिनेत्री 'इंडियन 3' आणि 'मेरी पत्नी'च्या रिमेकमध्ये काम करताना दिसणार आहे. अनेक दिवसांपासूनन एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने जैकी भगनानीसोबत लग्न केलं आहे.