विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी किती असतो पगार?

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. असं असताना सामान्यांना पडणारे प्रश्न म्हणजे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेतील सभापती यांना किती पगार असतो?

| Dec 18, 2024, 13:10 PM IST

राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकाला पाठोपाठ आता हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात 18 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज ही दोन्ही पदे भरली गेली. 

1/8

सातव्या वेतन आयोगानुसार, विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी म्हणून मानधन दिले जाते. 

2/8

सभापती अध्यक्ष यांना वेतन आणि इतर भत्ते मिळून 359500 रुपये इतका पगार दिला जातो.  यामध्ये 2 लाख 25 हजार - वेतन 1 लाख 12 हजार 500 - महागाई भत्ता  12 हजार - दूरध्वनी सुविधा 10 हजार - संगणक चालक सेवा भत्ता 

3/8

विधान परिषद उपसभापती आणि विधानसभा उपाध्यक्षांना 3,30,100 रुपये मासिक वेतन आहे. 

4/8

आमदरांना किती पगार?

विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांना 7 व्या वेतन आयोगानुसार, 3,01,300 रुपये पगार आहे.  ज्यामध्ये मूळ वेतन - 1,82,200 रुपये  महागाई भत्ता - 91,100 रुपये दूरध्वनी सुविधा - 8000  टपाल सुविधा 10,000  संगणक सेवा, चालक भत्ता - 10000 रुपये   

5/8

इतर सुविधा

आमदार आणि पीठासीन अधिकाऱ्यांना इतर सुविधा देखील पुरवल्या जातात. यामध्ये 2000 रुपयांचा दैनिक भत्ता, स्वीय सहायकाची सेवेकरिता 30000 रुपये तर वाहन चालकाला दर महिन्याला 20000 रुपये दिले जातात. 

6/8

प्रवासाकरिता मिळणारा भत्ता

तसेच सदस्याला प्रत्येकी 5 हजार रुपये मुल्याचा 3 कुपन संच पुस्तक दिले जाते जे हिरव्या रंगाचे असते. यामध्ये राज्याच्या कोणत्याही भागात रेल्वेने प्रथम वर्ग, वातानुकुलित टू टायर किंवा थ्री टायरने एकट्याने प्रवासाची सुविधा मिळते. 

7/8

प्रवासाकरिता सुविधा

5 हजार रुपयांची 3 कुपन संच जी पिवळ्या रंगाची असतात. ती दिली जातात. यामध्ये राज्याच्या बाहेर एकट्याने किंवा कुटुंबासोबत एका वर्षात 30 हजार किमी रेल्वे प्रवास करण्याची सुविधा आहे. 

8/8

यामध्ये राज्यातंर्गत 32 वेळा एका वेळेचा आणि राज्याबाहेर एकूण 8 वेळा विमानाने एका वेळेचा विमानाने मोफत प्रवास करण्याची सुविधा देखील सरकार देते.