मुंबई : अभिनेत्री राणी चॅटर्जीला भोजपुरी इंडस्ट्रीची राणी म्हटले जाते. राणी केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या अभिनयानेही चाहत्यांचा  मनावर राज्य करते. या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. त्यामुळेच आजही तिच्या अभिनयाच्या खूप चर्चा होतात. पण तुम्हाला माहित आहे का या अभिनेत्रीनं आतापर्यंत 465 वेळा वधू बनली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली अनेक वर्षे राणी चॅटर्जी भोजपुरी इंडस्ट्रीत काम करत आहे आणि आजही तिची लोकप्रियता सगळ्यांनाच माहित आहे. तसंच राणीला भोजपुरी राणी म्हटलं जात नाही. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर राणीचे नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडले गेले पण तिने अजून लग्न केलेले नाही. राणीचा चाहत्यांची कमी नसली तरी तिने लग्नापासून स्वतःला दूर ठेवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, खऱ्या आयुष्यात लग्न न केलेली राणी 465 वेळा पडद्यावर नवरी बनली आहे.



होय... स्वत: राणीनं एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिनं ही माहिती दिली होती की इतक्या वर्षांत ती शेकडो वेळा ऑनस्क्रीन वधू बनली आहे आणि आता ती आगामी चित्रपटातही ब्रायडल गेटअपमध्ये दिसणार आहे. राणीनं सांगितले की तिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 465 चित्रपट केले आहेत आणि या चित्रपटांमध्ये ती फक्त 465 वेळा वधू बनली आहे. आता ती पुन्हा एकदा 'गँगस्टर ऑफ बिहार'मध्ये नववधूच्या भूमिकेत दिसणार असून चाहत्यांना पुन्हा वेड लावणार आहे.


राणी चॅटर्जी ही भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीइतकीच लोकप्रिय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका चित्रपटासाठी 10-12 लाख रुपये फी घेते. याशिवाय, तिच्या लोकप्रियतेचे हे आश्चर्यकारक आहे की तिने आता ओटीटीमध्येही पाऊल ठेवले आहे.