`अल्लाची कृपा म्हणून...` वाढदिवसाच्या आधीच अभिनेत्रीला मिळालं दुसरं आयुष्य, फोटो पाहून चाहत्यांना धक्का
Reem Shaikh Incident: रीम शेखचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय.
Reem Shaikh Incident: अभिनेत्री रीम शेख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. 8 सप्टेंबरला रीम शेखचा वाढदिवस असतो. पण रिमने आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर केलाय. यामध्ये तिचा अर्धा चेहरा आणि डोळे दिसतायत. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय. या फोटोमध्ये रीमने पोस्टही शेअर केली आहे. काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया.
रीम शेखचा भीषण अपघात झाला. या अपघातातून वाचवल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले आहेत.
रीम शेखने लिहिली भावनिक पोस्ट
रीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 'मी एका दुःखद अपघाताची शिकार झाले, पण देवाने मला या अपघातातून वाचवले. असा अपघात होता, ज्यामुळे माझे आयुष्य बदलू शकले असते. काय चमत्कार घडतो...' हे तुमच्या आवडीचे चॉकलेट तुमच्या हातात घेऊन घडत नाही तर देवाच्या वेळेनुसार आणि नियोजनाने घडते, असे ती म्हणत तिने देवाचे आभार मानले.
वेदना विसरण्यास मदत झाली
'माझं आयुष्य बदलू शकणाऱ्या गोष्टीपासून मला वाचवल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. मी अल्लाहचे आभार मानते. या परिस्थितीत मला धीर दिल्याबद्दल आणि माझ्या चेहऱ्यावरील हास्यासाठी मी अल्लाहचा आभारी असल्याचे ती म्हणाली. मला खूप चांगले मित्र भेटायला आले आणि माझी काळजी घेतली याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमाने मला वेदना विसरण्यास मदत झाल्याचे ती सांगते.
सर्वांचे मानले आभार
आई आणि बाबा मी तुझ्यावर प्रेम करते. आई, बाबा, आजी, तुम्ही तिघे माझी शक्ती आहात. मी या कठीण काळातून बाहेर पडेन, याची खात्री तुम्ही केली. माझी काळजी घेतल्याचे सांगत तिने घरच्यांचे आभार मानले. माझे चाहते जे माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात. धन्यवाद.' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
वर्कफ्रंट
रीम शेख ही नीर भरे तेरे नैना देवी. मैं आजी और साहिब, ये रिश्ता क्या कहलाता है, ना बोले तुम, ना मैं कुछ कहा 2, खेलता है जिंदगी आँख मिचौली, दिया और बाती हम, चक्रवर्ती सम्राट अशोक, तुझसे है राबता, फना: इश्क में मरजावान आणि तेरे, यामध्ये अभिनय करताना दिसली आहे. सध्या ती लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे.