मुंबई : काही दिवसांपूर्वी सरकारने आधारकार्ड हे अनेक अकाऊंटशी लिंक करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी  आधारकार्ड हे प्रमुख ओळखपत्र ठरले होते. मात्र अनेकजण फेक आधारकार्ड बनवून सोयी-सुविधांचा उपभोग घेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या चक्रातून बॉलिवूड कलाकारही सुटलेले नाही. नुकताच उर्वशी रौतेलाचं नावही अशा स्कॅममध्ये आलं आहे.  २०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड, रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी वापर


काय आहे प्रकरण ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाचा वापर करून फेक आधारकार्ड बनवले जात आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः उर्वशीने केला आहे.  संबंधित प्रकरणाबाबत उर्वशीने वांद्रे येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 


उर्वशीने नावाने हॉटेल रूम होते बुक  


उर्वशीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नावाचा वापर करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली जाते. याकरिता फेक आधारकार्डाचा वापर केला जात असल्याचा दावा उर्वशीने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. 


हॉटेल स्टाफने दिली माहिती  


टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, उर्वशीला या धोकाबाजीची माहिती हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी दिली. एका अ‍ॅड एजन्सीच्या प्रतिनिधीला उर्वशी जेव्हा भेटायला गेली होती तेव्हा हॉटेलमधील कर्मचार्‍याने ही बुकिंग बाबतची माहिती दिली आहे.  


जेव्हा उर्वशीला माहिती मिळाली तेव्हा तिने ताबडतोब याबाबतचे डिटेल्स  चेक करायला सांगितले. तेव्हा उर्वशीच्या नावाने रूम बुक होत असल्याचं समजले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेथून बुकिंग केली जात आहे तेथील आयपी अ‍ॅड्रेसचे रेकॉर्ड्सदेखील चेक केले जात आहेत.