मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना आज सगळेच ओळखतात. अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज रेखा यांचा वाढदिवस आहे. (Rekha Birthday) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ऑक्टोबर 1954 ला चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखा यांनी करिअरची सुरुवात 1966 मध्ये बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांनी तेलगु सिनेमा रंगुला रतलाममध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी चार वर्षानंतर सावन भादो सिनेमात काम केलं होतं.


fitness secret of rekha: रेखा यांचा फिटनेस आज देखील अनेकांना लाजवेल असा आहे. 66 च्या वयातही त्यांनी ते जपलंय. 40 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी 180 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. त्यांचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ नेहमीच चर्चेत राहिलं.


networthtomb.com नुसार रेखा यांची संपत्ती 40 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 25 अरब रुपये आहे. रेखा वर्षभरात 65 लाख रुपये कमवतात. रेखा बांद्रा येथील बँडस्टँड (Rekha House) भागात राहतात.


celebritybaba.com च्या एका रिपोर्टनुसार रेखा (Rekha Fees) एका सिनेमासाठी 13 ते 14 कोटी रुपये घेतात. तसेच ब्रँड प्रमोशनसाठी त्या 5 ते 6 कोटी रुपये घेतात.


रेखा यांच्याकडे Land Rover Discovery, BMW 3 Series, Mitsubishi Outlander, Tata Nexa सारख्या गाड्या आहेत.


उमराव जान सिनेमासाठी रेखा यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2010 मध्ये भारत सरकारने रेखा यांना पद्मश्री सन्मान दिला.