नवी दिल्ली : अभिनेत्री रिचा चड्ढाने इन्स्टाग्रामवर मान्य केलंय की, ती अभिनेता अली फजलसोबत व्हेनिसमध्ये रहायला गेली आहे. रिचा गेल्या एक वर्षांपासून अलीला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिचाने इन्स्टाग्रामवर मंगळवारी पोस्ट केली की, ‘मला तूझ्यावर गर्व आहे. अली फजल! तु तूझ्या मेहनतीने हे मिळवलं आहे. एका चांगल्या सिनेमात तू चांगलं काम केलं आहे’.



अभिनेता अली फजल याने हॉलिवूडच्या ‘विक्टोरिया आणि अब्दुल’ या सिनेमात काम केलं असून या सिनेमाच्या वर्ल्ड प्रिमिअरसाठी तो व्हेनिसमध्ये आहे. अभिनेत्री रिवा चड्ढाही त्याच्यासोबत आहे. रिचाने दोघांचा सेल्फी शेअर केला आहे. या फोटोत प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जूडी डेंच या सुद्धा दिसत आहेत.
 



या फोटोही दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. रिचा व्हेनिसमध्ये सध्या रिकाम्या वेळात चांगलीच भटकंती करत आहे. रिचाचा ‘फुकरे २’ लवकरच रिलीज होणार आहे.