मुंबई : कधी कोणत्या अभिनेत्रीला पाकिट मारल्यामुळे अटक झाल्याची घटना ऐकली नसेल. पण बंगाली चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता (Rupa Dutta) हिला अटक झालीये. वृत्तानुसार, रूपाला पोलिसांनी पाकिट चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यादरम्यान घडली. (actress Rupa Dutta arrested for allegedly pick-pocketing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यात पिशवी टाकताना पाहिले, त्यानंतर महिलेला संशयाच्या आधारे पकडण्यात आले.


विधाननगर उत्तर पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक महिला डस्टबिनमध्ये बॅग टाकत असताना ही बाब उघडकीस आली. संशयावरून पोलिसांनी महिलेची चौकशी सुरू केली. यासोबतच बॅगचीही झडती घेण्यात आली, त्यात पोलिसांनी बरीच रोकड पकडली. बॅगची झडती घेतली असता त्यात आणखी अनेक पाकिटे पोलिसांना सापडली.



यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे कृत्य केल्याची कबुलीही महिलेने तपासात दिली आहे. जत्रा, कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारले जातात..
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपा दत्ता तीच अभिनेत्री आहे जिने काही वर्षांपूर्वी चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा चुकीचा आरोप केला होता. 2020 मध्ये रूपा दत्ताने अनुराग कश्यपवर फेसबुकवर चुकीचे संदेश पाठवल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर रुपा अनुराग याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचे समोर आले. रूपाने ट्विटमध्ये तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.