`माझा खास...` Ex Boyfriend बद्दल सबा आझादनं लिहिलेल्या पोस्टची का होतेय चर्चा?
हृतिक आणि सबा यावेळी मात्र वेगळ्याच मू़डमध्ये दिसले.
Saba Azad Instagram Post: सबा आझाद आणि हृतिक रोशन यांच्या डेटिंग (Saba Azad and Hritik Roshan Dating) चर्चा आता वाऱ्यासारख्या फिरू लागल्या आहेत. आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक रोशन कंगना राणावतला (Kangana Ranaut) डेट करत असल्याची बातमी समोर आली, त्यानंतर त्या दोघांचेही ब्रेकअप झाले. गेले कित्येक दिवस सिंगल असलेला हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत करण जोहरच्या पन्नासाव्या वाढदिवशी एकत्र दिसला होता तेव्हा त्या दोघांच्या चर्चांना उधाण आलं होतं. (Actress saba azad shares a special post for ex boyfriend emaad khan netizens reacts)
एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्टींग आणि शेअरींग करणारे हृतिक आणि सबा यावेळी मात्र वेगळ्याच मू़डमध्ये दिसले. सबानं आपल्या Ex Boyfriend बद्दल केलेली पोस्ट सध्या चर्चांचा विषय ठरते आहे. सबा आझाद ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दिन शहा यांचा मुलगा इमाद शहा (Emmad Shah) याच्यासोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यांचे ब्रेकअप झाले असले तरी ते अजूनही चांगले मित्र आहेत. ते किती चांगले मित्र आहेत याची प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे.
सबा आझादनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती इमाद शहाला आपला बेस्ट फ्रेंड असं म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. ती म्हणते की, 'जगातील सर्वात सुरेख माणूस, प्राण्यांवर प्रेम करणारा, माझ्या बॅण्ड पार्टनर, माझा खास मित्र तूला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!, तुला दीर्घ आयुष्य लाभो...'
इमाद आणि सबानं दोन वर्षांपुर्वी ब्रेकअप केले. आता लवकरच सबा तिच्या अप कमिंग प्रोजेक्ट्समधून दिसण्याची शक्यता आहे. हृतिक रोशनचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा तद्दन मसाला पट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचसोबतच तो दीपिका पादूकोनसोबत (Deepika Padukone) फाईटर (Fighter) या चित्रपटातही दिसणार आहे.