मुंबई | सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही नवं शेअर करत असतात. कधी नव्या प्रोजेक्टची बातमी, तर कधी हटके अंदाजातील आपले फोटोज ते पोस्ट करताना दिसतात..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींच्या फॅशन आणि स्टाईलची सर्वात जास्त चर्चा पाहायला मिळते.अनेकदा फॅन्स आपल्या लाडक्या कलाकारांची ड्रेसिंग फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनेत्री सई लोकूर देखील आपल्या इंस्टाग्रामवर आपले नवनवीन लूकमधील फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. 


गेल्या काही दिवसांपासून सई दररोज आपले हटके लूकमधील फोटो पोस्ट करताना दिसतेय. कधी साडीतील पारंपारिक अंदाजातील फोटो ती शेअर करते. तर कधी ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील वेस्टन लूक ती ट्राय करताना दिसते.त्यात सध्या सईच्या कलरफुल साडी कलेक्शची चांगलीच चलती आहे. एकापेक्षा एक अशा डिझाईन साडीतील फोटो सईने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. 


जर तिच्या प्रोफाईलवर नजर मारली तर सईकडे असलेल्या साड्यांचे जबरदस्त कलेक्शन पाहायला मिळेल.मागील वर्षी बेळगाव येथे सईने तिर्थदीप रॉयसोबत लग्न करत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. त्यावेळी दोघांच्या वेडिंग लूकची देखील कमालीची चर्चा पाहायला मिळाली होती.