मुंबई : एखादी अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली, की तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आसुसलेले असतात. कलाकारही चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमाला मोठ्या मनानं स्वीकारतात. पण, आता अशी वेळ आहे की एका लोकप्रिय अभिनेत्रीला सर्वांपासून तोंड लपवण्याची वेळ आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तिनं असं का केलं हा मोठा प्रश्न. सर्वात आधी ती अभिनेत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आहे, साई पल्लवी.


साई पल्लवीच्या लोकप्रियतेबाबत वेगळं काहीच सांगायला नको. विविध धाटणीच्या आणि तितक्याच वैविध्यपूर्ण कथानक असणाऱ्या चित्रपटांच्या नावांची नोंद तिच्या कारकिर्दीत आहे.


याच साईनं म्हणे आता सर्वांपासून तोंड लपवलं आहे. त्यामागे कारण होतं, तिचा नवा चित्रपट.


एक सेलिब्रिटी असल्यामुळं सहसा कलाकारांना सर्वसामान्यांप्रमाणं चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहणं शक्य होत नाही.


साईनं मात्र यावर उपाय शोधला. तिनं बुरखा घालत, तोंड लपवत थेट चित्रपटगृह गाठलं. ‘श्याम सिंह रॉय’ या चित्रपटातील भूमिकेसाठी साईची प्रशंसा होऊ लागली.


शेवटी तिलाही हा चित्रपट चाहत्यांसमवेत चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहण्याचा मोह आवरला नाही आणि तिनं बुरखा घालत थिएटर गाठलं.


ही साई आहे, याची कोणालाच कुणकूणही लागली नाही. पण, इंटरनेटवर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामाध्यमातून साईनं केलेली ही करामत सर्वांच्या समोर आली.



मग काय, आम्ही साई पल्लवीसोबत चित्रपच पाहिला असं सांगणारेही अनेक चाहते आढळून आले (sai pallavi).