Sai Tamhankar Photo: सई ताम्हणकर ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. उद्या सईचा वाढदिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्पेनमध्ये फिरायला गेलेली पाहायला मिळते आहे. ती आपले खास फोटोही इन्टाग्रामवरून शेअर केले आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंचीही चांगलीच चर्चा आहे. आता सई ही स्पेनला आपल्या बॉयफ्रेंडसोबत गेली आहे. यावेळी तिनं मराठी चित्रपट निर्माता अनिश जोगसोबत दिसते आहे. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र दिसत आहेत आणि त्यांच्या डेटिंगच्याही चर्चा रंगलेल्या असतात. त्यांचा ग्रुपही आहे आणि ते अनेकदा आपल्या मित्रमैत्रींणीसमवेत एन्जॉय करताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'गर्लफ्रेंड', 'धुरळा', 'YZ', 'टाइम प्लीज', 'मुरांबा' अशा काही चित्रपटांचा अनिश जोग हा निर्माता आहे. निश आणि सई गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सईचा काही वर्षांपुर्वी घटस्फोट झाला असून ती सिंगल होती. त्यानंतर ती आता अनिश जोगला डेट करत असून ते अनेकदा एकत्रही स्पॉट झाले आहेत. त्यामुळे ते दोघं चांगलेच चर्चेत असतात. आता ते दोघं स्पेनमध्ये आपला वेळ स्पेंड करताना दिसत आहेत. अनिशनं इन्टाग्राम स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात अनिश आणि सई एकत्र दिसत असून ते दोघं बरेच रोमॅण्टिक दिसत आहेत. 


सई आणि अनिश हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांतूनही एकत्र कामं केली आहेत. ते गेल्या वर्षांभरापासून रिलेशनशिपध्ये आहेत. त्यांनी याआधीही एकमेकांसोबत फोटो शेअर केले आहेत. अनिषनं जो फोटो शेअर केला आहे त्यात त्यानं कॅप्शन दिलेलं नाही. सोबतच या फोटोमध्ये सईनं अनिषला मिठी मारली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 



दोन वर्षांपुर्वी सईचा 'मिम्मी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे तिला आयफा अवोर्डही मिळाला आहे. सध्या सई ही ओटीटीवरही झळकताना दिसते आहे. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. मागील वर्षीही तिची 'पेटपुराण' ही वेबसिरिज मग तिचा 'मिडियम स्पायसी' हा चित्रपट प्रचंड गाजला, त्याआधी आलेला पॉडेंचरी हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. आता सई कुठल्या नव्या भुमिकेतून दिसणार आहे. याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातून काही दिवसांपुर्वी तिच्या एका नव्या वेबसिरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यात तिचा लेस्बियन सीन गाजतो आहे.