मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला आज कोण ओळखतं नाही, तिला ओळखत नाही असं क्वचितच कोणी असले. सोशल मीडियावर सई ताम्हणकरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सई कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहतेही नेहमी घायाळ होत असतात. सध्या सई सिनेसृष्टीपासून लांब असली तरी ती हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आजपर्यंत सईने मराठी सिनेसृष्टीला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. नुकतीच सई ताम्हणकरने झी मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच झी मराठीच्या सोशल मीडियावर याचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. सईने तिचा हा फोन यावेळी तिने मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना फोन लावला.


सुत्रसंचालक अवधूत गुप्तेने यावेळी सईला म्हटलंय की, सई तुला एक फोन लावयचा आहे. हा जादूचा फोन कोणाला लावायचा आहे. यावर सई म्हणते, मी मराठी चित्रपट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हा फोन करणार आहे. यानंतर सई हा जादूचा फोन उचलते. आणि म्हणते,, ''हाय कसा आहेस, सगळ्यात आधी खूप धन्यवाद, आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल, सदिच्छांबद्दल आणि मला सर्वस्वी स्वीकारुन मी जिथपर्यंत पोहोचली आहे तिथपर्यंत पोहोचवण्याबद्दल. पण गेली दोन-चार वर्ष मला असं वाटतंय की तू रुसलास बाबा… काय कारण आहे.


मला माहितीये की आता तुझे नवीन मित्र झालेत, एकदम नवखे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर तू जास्त असतोस. पण म्हणून मग तू जुन्या मित्रांना विसरणार आहेस का? तुही मला आज एक वचन दे, तू तुझा रुसवा-फुगवा विसरुन तू पुन्हा येशील'',असा संवाद यावेळी सईने तिच्या चाहत्यांसोबत साधला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या सईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सईचा हा भावूक संवाद तिच्या चाहत्यांनाही खूप भावला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत सगळं सुरळीत होईल आम्ही आहोत तुझ्यासोबत अशा कमेंट्स करत सईला धीर दिला आहे.