Entertainment News : बॉलिवूडमध्ये (bollywood) काही अभिनेत्री चौकटीबाहेरच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जातात. अशाच काही नवख्या अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे, सैयामी खेर (saiyami kher). तिनं संपादन केलेलं यश आणि मुख्य म्हणजे तिचा फिटनेस सध्या भलताच चर्चेत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे जर्मनीतील प्रतिष्ठीत आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉन. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असा हा विविध प्रकारांची सांगड घालून तयार करण्यात आलेला मॅराथॉनचा प्रकार यशस्वीरित्या पूर्ण करणारी ही पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे. आयर्नमॅन 70.3 ट्रायथलॉनमध्ये 1.9 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमीची मॅरेथॉन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे. 


आयर्नमॅन 70.3 ला हाफ आयर्नमॅन म्हणूनही ओळखलं जातं. जगातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जिथं सहभागी अॅथलिटच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळते. अनेक अनुभवी खेळाडूंनाही या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषा गाठण्यात अडचणी येतात. पण, सैयामीनं तिच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे आव्हान साध्य केलं आहे. 


अशी केली तयारी... 


आपल्या क्षेत्राला पुरेसा वेळ देत चित्रपट आणि चित्रीकरणाच्या कामातून वेळ काढत सैयामीनं वर्षभरापासून या ट्रायथलॉनसाठी स्वत:वर काम करण्यास सुरुवात केली. ही स्पर्था, ही अनोखी शर्यत पूर्ण करत ते पदक मिळवणं हा आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद क्षण होता, असं ती म्हणाली. आपल्याला जीवनात काही गोष्टी  साध्य करायच्या असतात आणि ही स्पर्धा माझ्यासाठी त्याच गोष्टींपैकी एक असल्याचं सांगत तिनं आलेल्या आव्हानांवरही उजेड टाकला. 



हेसुद्धा वाचा : नोकरदार वर्गासाठी PM मोदींचं गिफ्ट; निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी रुपये; कसा करून घ्याल फायदा?


12 ते 14 तासांचं चित्रीकरण आणि त्यातच सुरू असणारं प्रशिक्षण पाहता आपल्याला स्वत:शीच स्पर्धा सुरू असल्याचं जाणवत होतं. सैयामीनं संपादन केलेलं हे यश पाहता कलाजगतातूनही अनेकांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यानंही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट लिहित तिचं कौतुक केलं. 


एकिकडे असाध्य स्वप्नाला गवसणी घालणारी सैयामी या यशाचा आनंद साजरा करत असतानाच आता दुसरीकडे ती आगामी चित्रपटांवरही लक्ष केंद्रीत करत आहे. तेलुगु चित्रपट निर्माता गोपीचंद मालिनेनीच्या 'एसजीडीएम' चित्रपटातूनही की झळकणार आहे.