मुंबईः 'पुष्पा द दाईझ' या टॉलीवूड सिनेमामुळे समांथा रूथ प्रभू ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा 'Oo Bolega Ya Oo Oo Bolega' या गाण्यावर डान्स विशेष गाजला होता. त्यामुळे तिच्या या आयटम सॉन्गनंतर समांथा भलतीच चर्चेत आहे. परंतु सध्या समांथा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथा ही जास्त करून साऊथ फ्लिम्समधून पुढे आलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक हिटवर हिट सिनेमे दिले आहेत त्यातला तिचा नुकताच रिलिज झालेला 'पुष्पा' हा चित्रपट विशेष करून गाजला. 


समांथा ही सोशल मीडियावर एक्टिव असते. तिचे फोटोजसुद्धा चाहत्यांनी मंत्रमुग्ध करत असतात. पण सध्या समांथा आपले फोटोज शेअर करत नसून सध्या ती कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तिचे सोशल मीडिया अकांऊट फार शांत आहे तिने अजूनतरी काहीच शेअर किंवा पोस्ट केलेलं नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये विशेष खळबळ माजली आहे. 


समंथा रुथ प्रभूने नागा चैतन्यपासून आपण वेगळे होत असल्याची घोषणा केली तेव्हाही ती सोशल मीडियावर फारच कमी वेळी सक्रिय होती आणि आता परत सामंथाची सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी कमी झाली आहे. ती मध्यंतरीच मानसिक आरोग्यवर चाहत्यांशी बातचित केली होती. त्यामुळे चाहते तिच्या मानसिक आरोग्याला घेऊन चिंतेत आहेत तसेच ती सोशल मीडियाचा केलेला त्याग याच कारणामुळे नाही ना... म्हणून चाहतेही बैचेन झाले आहेत. 


काहींना असेही वाटत आहे की ती तिच्या पर्सनल कारणांमुळे सोशल मीडियापासून बाजूला राहिलेली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही युझर्सनी तिला विचारले आहे की,'' तू नेहमीच छान सक्रिय असतेच मग आज तूला अचानक काय झाले... तूझे फोटोज नाहीत, व्हिडीओ नाहीत... काही चर्चाही नाही... तू कुठे आहेत आणि काय झाले आहे सॅम...'' अशा भाषेत तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. 


सामंथा रुथ प्रभूचा पुढचा चित्रपट 'रुद्रमादेवी' हा असेल. गुण शेखर दिग्दर्शित 'शाकुंतलम' या चित्रपटातही ती काम करते आहे या पौराणिक फिल्ममध्ये ती महाराणी शकुंतला देवीची भूमिका साकारणार आहे.