मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभु पुष्पा सिनेमामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील आयटम साँगनंतर तिचं नाव बॉलिवूडमध्ये ही चर्चेत आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काहीतरी शेअर करत असते. समंथा तिच्या फिटनेस रूटीनबद्दल चाहत्यांना सांगताना दिसते.आता तिच्या एका नव्या टॅलेंटबद्दल चाहत्यांना कळलं आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. असं काही तरी करताना चाहते तिला पहिल्यांदाच पाहत आहेत.


हा व्हिडिओ व्हायरल होताच काहींनी तिला प्रश्न विचारला आहे की, तू अभिनय सोडला आहेस का? ती करत असलेल्या नवीन कामाबद्दल तिला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ती हे काम का करतेय असं ही तिला विचारलं जात आहे. 
त्यात समंथाने तिला उत्तम हेअरकटींग करता येत असल्याचं दाखवलं आहे.



समंथाने तिच्या एका स्टायलिस्टचा मेकओव्हर केला आहे. ज्याचा व्हिडिओ तिने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये समंथा तिच्या स्टायलिस्टचे केस कापताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की - Multitalent me


दुसऱ्या व्हिडिओमध्ये समंथा तिच्या स्टायलिस्टचे केस नीट करताना दिसत आहे. समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समंथाची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.