Samantha Naga Spotted Together : दाक्षिणात्य कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आला ही बातमी आता नवी नाही. मुळात पहिल्यांदाच जेव्हा त्यांच्या विभक्त होण्याची बाब समोर आली, तेव्हा अनेकांनाच धक्का बसला होता. पण, पुढे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हणत तुलनेनं चर्चा कमी झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नात्याच दुरावा आल्यानंतर समंथा आणि नागा चैतन्यमध्ये बरीच समीकरणं बदलली असावी. त्याचा प्रत्यय देणाऱ्या काही घटनाही घडल्या. (samantna akkineni naga chaitanya )


आता म्हणे घटस्फोटानंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली आहे. ज्यानंतर ही जोडी नात्याला एक नवी संधी देणार का, अशा चर्चांनीही जोर धरला आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनाही हैदराबादमधील रामानायडू स्टुडिओमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. 


'चै', तिथं 'बंगाराजू'चं चित्रीकरण करत असल्याचं म्हटलं गेलं. तर, समंता तिथं आगामी 'यशोदा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. 


नागा चैतन्य आणि समंथा एकदुसऱ्यांसमोर आले खरे. पण, त्यांच्यापैकी कोणीही काहीच बोललं नाही. चित्रीकरणानंतर दोघंही आपआपल्या वाटांना निघून गेले. 


काही क्षणांसाठी ते एकमेकांकडे किमान पाहती, काहीतरी बोलतील असं सर्वांना वाटलं पण, तसं काहीच होऊ शकलं नाही. 



चाहत्यांनी मात्र उगाचच या नात्यात नवी आशा दिसत असल्याच्या चर्चांना वाव दिला, पण तसं काहीच होऊ शकलेलं नाही.