Sara Ali Khan Ramp Walk: अभिनेत्री सारा अली खान आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. त्याचबरोबर कार्तिक आर्यनसोबतची रिलेशनशिप, फिटनेससाठीही ती लोकप्रिय आहे. परंतु आजकाल मात्र ती आपल्या रॅम्पवॉकवरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. साराने याआधी काही फॅशन शोजसाठी रॅम्पवॉक केला आहे परंतु तो सपेशल फसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खानने नुकत्याच एका फॅशन शोला हजेरी लावली होती. फॅशन डिझायनर फाल्गूनी शेन पिकॉक या फॅशन ब्रॅण्डसाठी तिने रॅम्पवॉक केला होता. त्यादरम्यान तिने काळ्या रंगाचा शिमर गाऊन घातला होता जो बेकलेस आणि कट गाऊन होता. आपल्या अदांवर तिचे चाहते भुलले असेल तरी मात्र तिच्या रॅम्पवॉकची सगळ्या ट्रोलर्सनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे सध्या सारा अली खानचा रॅम्पवॉक हा चर्चेचा विषय होत आहे. 


याआधी तिने असाच एक रॅम्पवॉक केला होता ज्यासाठी तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ट्रोलर्सनी तिला नेपोटिझन प्रोडक्ट म्हणून हिणवले. तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरूनही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. रॅम्प वॉकच्या बाबतीत हिच्यापेक्षा कंगना राणावतचा रॅम्प वॉक बरा, असेही बोलूनही ट्रोलर्सनी तिला हिणवले आहे. 2020 साली तिने लॅक्मे फॅशन वीकच्या एका शोमध्ये तिने शो स्टॉपर म्हणून हजेरी लावली होती. परंतु हा रॅम्पवॉक बघून सगळेच नाचता येईता अंगण वाकडे अश्या भाषेत तिची खिल्ली उडवू लागले. 



या तिच्या नव्या रॅम्पवॉकला घेऊनही ट्रोलर्सनी तिला परत ट्रोल केले आहे. यावेळीही तिच्या facial expressions मुळे तिला चिडवण्यात आले आहे. त्यापैंकी काहींंनी नेपोटिझमचा विषय पुन्हा काढून तिला हिणावले आहे. 



सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. तिने 2018 मध्ये बॉलीवूडमधून पदार्पण केले होते. नुकताच तिचा 'अतरंगी रे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.