मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलागी अभिनेत्री सारा अली खान आता संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिन बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय तिची जीवन शैली देखील अनेकांना प्रेरणा देवून जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. इन्स्टग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या आठवणींना उजाळा देत तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधील सारा आणि आताची सारा  या दोघींनमध्ये प्रचंड फरक दिसून येत आहे. व्हिडिओमधील सारा अत्यंत जाड अशी आहे तर आताची ग्लॅमरस सारा यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. 



साराचा हा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साराने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'पेश है सारा का सारा सारा...' असं लिहलं आहे. सारा हा क्यूट व्हिडिओ एका तासामध्ये तब्बल १७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर साराचे १७ मिलियन पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. 


सध्या सारा तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिक आर्यन स्टारर 'लव आज कल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या व्यतिरिक्त ती  अभिनेता वरूण धवन स्टारर 'कुली नं. १' चित्रपटात देखील झळकणार आहे.