मुंबई : ८२ वर्षीय अभिनेत्री शकीला यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शकिला यांचा भाचा नासिर यांनी फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री  शकिला यांनी दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या ' आर पार' आणि 'सीआयडी' या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाप्रमाणेच शकीला यांनी शम्मी कपूर सोबत चायना टाऊन हा चित्रपट केला. याचित्रपटातील त्यांच्या कामाची विशेष दखल घेण्यात आली. पण १९६१ साली त्या हिंदी सिनेसृष्टीपासून दूर गेल्या. त्यानंतर विवाहबद्ध झालेल्या शकीला परदेशात स्थिर झाल्या.  




शकिला या ५० आणि  ६० च्या दशकातील स्टार होत्या.  'बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभालना' हे गाणं त्यांच फार गाजलं. आज २१  सप्टेंबर रोजी माहीमच्या कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.